पंचवटी : तपोवन केवडीबन येथील जलाराम बाप्पा मंदिरात जलाराम बाप्पा यांची २१८वी जयंती विविध कार्यक्र मांनी साजरी करण्यात आली. जलाराम बाप्पा जयंती व मंदिराचा १७वा वर्धापनदिन यानिमित्ताने जलाराम बाप्पांच्या प्रतिमेची पंचवटी परिसरातून शोभायात्रा काढण्यात आली. जलाराम जयंतीनिमित्ताने सकाळी ९ वाजता देवदेवता मंगल आरती व त्यानंतर किशोरभाई संघानी, अमित पुजारा यांच्या हस्ते जलाराम बाप्पांची महापूजा करण्यात आली. त्यानंतर ११ वाजता सुंदरकांड पाठ पठण, अन्नकुट दर्शन, भोग आरती करण्यात येऊन दुपारी भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी ७ वाजता मंदिरात आरती, भजन संध्या व महापूजा कार्यक्र म संपन्न झाला. त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी मंदिराचे भाईलाल पुजारा, महेश शहा, भरत ठक्कर, नरेश गावडा, प्रफुल्ल ढोलकिया, हसमुखभाई शिंगाडा, धनसुखभाई गावडा, जगदीश ठक्कर, करसनभाई ठक्कर, दिनेशभाई चंदे, विनय सोमय्या आदींसह जलाराम बाप्पा जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.फुलांनी सजविलेल्या बग्गीतून शोभायात्रामालवीय चौकातील जलाराम मंदिर येथून सवाद्य शोभायात्रा काढण्यात आली. फुलांनी सजविलेल्या बग्गीत जलाराम बाप्पा यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. मालवीय चौकातून निघालेली शोभायात्रा पुढे नाथ लेन, शिवाजी चौक, पाथरवट लेन, गजानन चौक, गुरुद्वारारोडने, वेताळबाबा मंदिरमार्गे, टकलेनगर, कृष्णनगर भागातून काढण्यात येऊन तपोवन केवडीबन येथील जलाराम बाप्पा मंदिरात समारोप करण्यात आला.
जलाराम बाप्पा जयंती मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:17 AM