निफाड : तालुक्यातील जळगांव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी वनीता गणेश वडघुले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.जळगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंच कांताबाई वडघुले यांनी रोटेशन पद्धतीने राजीनामा दिल्याने या रिक्त जागेवर विनता वडघुले यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली. उपसरपंचपदाच्या निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक संजय सोमवंशी यांनी काम पाहिले. उपसरपंचपदाच्या निवडीसाठी झालेल्या बैठकीसाठी सुधीर कराड, सरपंच विष्णू कुंदे, कांताबाई वडघुले, विद्या वडघुले, सुमन गायकवाड, अनुसया थीगळे, शोभा निरभवणे, वैभव जळगावकर आदी ग्रा. प. सदस्य उपस्थित होते. उपसरपंचपदासाठी विनता वडघुले यांचे एकमेव नामनिर्देशनपत्र दाखल झाले होते. वडघुले यांचे एकमेव नामनिर्देशनपत्र दाखल झाल्याने निवडणूक निर्णयाधिकारी सोमवंशी यांनी विनता वडघुले यांची उपसरपंचपदी निवड झाल्याचे जाहीर केले. याप्रसंगी रतन पाटील वडघुले, अशोक वडघुले, विश्वास कराड, माधव वडघुले, सेनेचे तालुका प्रमुख सुधीर कराड, ज्ञानेश्वर वडघुले, शंकर नागरे, युवराज वडघुले, जाफर पिंजारी, सतीश नागरे, वैभव देशमुख, नितीन वडघुले, भाऊसाहेब निरभवणे, चेतन निरभवणे, दत्तात्रय नागरे, बापू कराड, विजय वडघुले, गोविंद वडघुले, रमेश वडघुले, अमति वडघुले, उमेश नागरे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
जळगाव ग्रामपंचायत उपसरपंचपदी वनीता वडघुले बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2019 6:08 PM
निफाड : तालुक्यातील जळगांव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी वनीता गणेश वडघुले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जळगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंच कांताबाई वडघुले यांनी रोटेशन पद्धतीने राजीनामा दिल्याने या रिक्त जागेवर विनता वडघुले यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली. उपसरपंचपदाच्या निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक संजय सोमवंशी यांनी काम पाहिले.
ठळक मुद्देरोटेशन पद्धतीने राजीनामा दिल्याने या रिक्त जागेवर विनता वडघुले