जळगाव नेऊर : येथील कुलदैवत खंडेराव महाराज यात्रोत्सवामध्ये येळकोट येळकोट जय मल्हारचा जागर करत बारागाड्या ओढण्याचा कार्यक्र म उत्साहात पार पडला. पाच ते सात हजार भाविकांच्या उपस्थितीत वाद्य व वाघ्या, मुरळीच्या मल्हार-म्हाळसा गीतांवर तरुणांनी थिरकत भंडार उधळत जयघोष केला.भव्य काठी तसेच पालखी व अश्व मिरवणुकीबरोबर सात दिवस विविध वाघे मुरळी पार्टीचे जागरण गोंधळ कार्यक्र म आयोजित करण्यात आले होते. दगडू वाकचौरे सह बाळू धुमाळ (शिरसगाव लौकी), शिवमल्हार गायन पार्टी (पालखेड मिरचीचे), मीरा कावळे (औरंगाबाद), नंदू सोनवणेसह किसन गुंडगळ (कातरवाडी), अशोक सदगीर यांच्यासह सविता साळुंके (औरंगाबाद), गोरख डावरेसह सविता पवार (सिन्नर), दत्तूू लगद यांच्यासह गंगूबाई लगद (नाशिक) यांचे जागरण-गोंधळाचे कार्यक्र म झाले. यावर्षी बारागाड्या ओढण्याचा मान बाळनाथ शिंदे यांना मिळाला. रात्री लंगर, जागरण गोंधळ झाला. यात्रा व बारागाड्या ओढण्याच्या यशस्वीतेसाठी प्रभाकर शिंदे, आप्पा शिंदे, राधाकिसन वाघ, अशोक वाघ, गणपत गुंड, विजय शिंदे, अशोक शिंदे, सर्जेराव शिंदे, बाळासाहेब चव्हाणके, शालिग्राम महाले, शांताराम शिंदे, शरद दाते, नवनाथ तांबे, नानासाहेब शिंदे यांनी प्रयत्न केले. जळगाव नेऊर परिसरातील पुरणगाव, नेवरगाव, शेवगे सातारे, जवळके, पिंपळगाव लेप या परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
जळगाव नेऊरला येळकोट येळकोट जय मल्हार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 12:23 AM
कुलदैवत खंडेराव महाराज यात्रोत्सवामध्ये येळकोट येळकोट जय मल्हारचा जागर करत बारागाड्या ओढण्याचा कार्यक्र म उत्साहात पार पडला. पाच ते सात हजार भाविकांच्या उपस्थितीत वाद्य व वाघ्या, मुरळीच्या मल्हार-म्हाळसा गीतांवर तरुणांनी थिरकत भंडार उधळत जयघोष केला.
ठळक मुद्देखंडेराव महाराज यात्रोत्सव : बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम उत्साहात