पेठ : पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे होणारे साथीचे आजार रोखण्यासाठी पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने पाणी गुणवत्ता कार्यक्र मांतर्गत सार्वजनिक जलकुंभ व हातपंप शुध्दीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली असून, पेठ तालुक्यात या अभियानास चांगला प्रतिसाद मिळत आहे.ग्रामीण जनतेला शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा, यासाठी ग्रामपंचायत, अंगणवाडी, प्राथमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रासह शासकीय व सार्वजनिक ठिकाणी पाणीपुरवठा करणाऱ्या जलकुंभाची स्वच्छता करण्यास सुरु वात झाली आहे.ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य सहायक, जलसुरक्षा रक्षक यांच्या मदतीने जलकुंभांची स्वच्छता करण्यात येणार असून, हातपंपांची दुरु स्ती व शुद्धीकरणहीकरण्यात येणार आहे. पाणी शुद्धीकरणासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.टीसीएल पावडरची उपलब्धता, वाटप नियोजन व कार्यवाही बाबतची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनावर सोपवण्यात आलीआहे.----------------------------शाळांच्या टाक्या झाल्या स्वच्छ१ जूनपासून सुरू झालेल्या अभियानाता पेठ तालुक्यातील २२६ शाळांनी शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता केली असून, शिक्षकांनी सुटीच्या कालावधीत विद्यार्थी व ग्रामस्थांच्या मदतीने कोरोनाबाबत खबरदारी घेत टाक्यांची स्वच्छता करून घेतली. गटशिक्षण अधिकारी सरोज जगताप यांनी केलेल्या आवाहनाला शिक्षकांनी प्रतिसाद दिल्याने जवळपास सर्वच शाळांवर सदर अभियान राबवण्यात आले.साथीच्या आजारांवर उपाययोजनासध्या पावसाचे दिवस सुरू झाले असून, केवळ दूषित पाण्यामुळे अनेक प्रकारचे साथीचे आजार उद्भवतात. अशावेळी प्रशासनावर मोठा ताण पडत असून, यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याचा संभव असतो. म्हणून पावसाळ्यापूर्वीच यावर उपाययोजना करण्यात येणार असल्यानेआगामी काळात साथीचे आजार रोखण्यात प्रशासनाला काही प्रमाणात यश येईल. सध्या कोरोनाचे संकट असल्याने त्यात साथीच्या आजारांची भर पडूनये, यासाठी प्रशासन सतर्कअसल्याचे गटविकास अधिकारी नम्रता जगताप यांनी सांगितले.----------------------नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा. या दिवशी घरातील सर्व पाण्याचे साठे, भांडी रिकामी करून स्वच्छ धुऊन उन्हात वाळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच सार्वजनिक जलकुंभाच्या दर्शनीभागात पक्क्या रंगांनी जलकुंभ स्वच्छतेची तारीख प्रदर्शित करण्याबाबत सुचवण्यात आले आहे.- नम्रता जगताप, गटविकास अधिकारी, पेठ
पेठ तालुक्यात जलकुंभ स्वच्छता अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2020 9:16 PM