केंद्रीय मंत्रिमंडळात डॉ. भारती पवार यांची वर्णी लागण्याच्या चर्चेला दुपारपासून सुरुवात झाली आणि जिल्ह्याच्या अपेक्षा उंचावल्या. सायंकाळी डाॅ. भारती पवार यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याच्या चर्चेवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर कळवण तालुक्यासह दिंडोरी मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी करून भाजपच्या नावाने घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी तालुकाध्यक्ष दीपक खैरनार, सुधाकर पगार, निंबा पगार, डाॅ. अनिल महाजन, विश्वास पाटील, एस. के. पगार, विश्वास पाटील, कृष्णकुमार कामळस्कर, विकास देशमुख, गोविंद कोठावदे, हितेंद्र पगार, चंद्रशेखर जोशी, भिका वाघ, मोती वाघ, काशीनाथ गुंजाळ, ज्ञानेश्वर गुंजाळ, अमित देवरे, भूषण देसाई, प्रभाकर निकम, सचिन सोनवणे, रवींद्र पवार, सोहन महाजन, विवेक पाटील, गणेश मुसळे, सुनील गुंजाळ, किरण ठाकरे, किरण पाथरे, किशोर देशपांडे, सागर जाधव, नाना खैरनार, बेबिलाल पालवी आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इन्फो
दळवटला तिसऱ्यांदा लाल दिवा
कळवण विधानसभा मतदारसंघातील अवघ्या हजाराच्या आसपास लोकसंख्या असलेल्या दळवट गावाने तालुक्याला स्व ए. टी. पवारांच्या रूपाने ८ वेळा आमदार, ४ वेळा मंत्रिपद, तर जयश्री पवार यांच्या रूपाने नाशिक जिल्हा परिषदेला पहिली आदिवासी महिला अध्यक्ष दिली आहे. त्याच पवार कुटुंबातील डॉ. भारती पवारांच्या रूपाने जिल्ह्याला पहिली महिला खासदार आणि त्यानंतर केंद्रीय मंत्रिपद मिळविण्याचा मान मिळाला. दळवटला त्यांच्या रूपाने तिसऱ्यांदा लाल दिवा मिळाल्याने ग्रामस्थांमधील आनंद ओसंडून वाहत होता. भारती पवार यांच्याही कुटुंबीयांनी पेढे वाटून आनंद साजरा केला.
फोटो- ०७ कळवण जल्लोष-१/२
070721\07nsk_34_07072021_13.jpg~070721\07nsk_35_07072021_13.jpg
फोटो- ०७ भारती पवार ~फोटो- ०७ भारती पवार