प्रमुख अतिथी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अभिजित कदम उपस्थित होते. शिबिरात नगरपरिषदेचे पदाधिकारी, कर्मचारी तसेच सफाई कर्मचारी यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते मोफत जलनेती पत्रांचे वाटप करण्यात आले. योग प्रशिक्षक राहुल (अंबादास) बी. येवला यांनी जलनेती ही नासिका मार्गाची शुद्धिक्रिया असून, संसर्गजन्य आजारासाठी तसेच श्वसनाच्या विकारांवर कशी प्रभावी आहे याचे प्रात्यक्षिकासह महत्त्व विशद केले. त्यानंतर राहुल येवला यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी कोविड १९च्या सर्व नियमांचे पालन करत वेगवेगळ्या गटात जलनेतीचा प्रात्यक्षिक अभ्यास केला. शेवटी सर्व लाभार्थी कर्मचाऱ्यांनी जलनेती ही शुद्धिक्रिया आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त व फायदेशीर असल्याचे मनोगत व्यक्त केले. तसेच मुख्याधिकारी अभिजित कदम यांनी कोविड प्रतिबंधासाठी जलनेती उपयुक्त असून, चांदवडच्या नागरिकांनी या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. शिबिराच्या आयोजनासाठी इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशनचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष स्वामी शिवानंद महाराज, जिल्ह्याचे अध्यक्ष डॉ. रमाकांत जाधव व उपाध्यक्षा डॉ. तिस्मना शेख यांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अभिजित कदम, हर्षदा राजपूत, शेषराव चौधरी, सत्यवान गायकवाड, ब्रिजेस सिंग, सोमनाथ देवकाते, अनिल कुरे, तुषार बागुल, पवन कस्तुरे, संजय गुरव, राजेंद्र बेलदार, संजय बरकले, कैलास गांगुर्डे, संदीप कोतवाल, जिशान खान, शरद धोत्रे, अशोक बनकर, अमोल आहेर, संदीप महाले, मुफिज शेख, गोपाळ ठाकरे, महेंद्र कांदळकर, स्वप्निल बच्छाव, भूषण साळी आदी कर्मचारी उपस्थित होते.
फोटो - २५ चांदवड १
चांदवडला मोफत जलनेती पात्रांचे वाटप करताना नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अभिजित कदम यांना पत्र देताना योग प्रशिक्षक राहुल येवला. समवेत कर्मचारी.
250721\25nsk_47_25072021_13.jpg
चांदवडला मोफत जलनेती पात्नांचे वाटप करताना नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अभिजीत कदम यांना पत्र देतांना योग प्रशिक्षक राहुल येवला. समवेत कर्मचारी.