बागलाणच्या पश्चिम पट्ट्याबरोबर सटाणा शहराच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यात महत्त्वाची भूमिका असलेले केळझर धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, दरवर्षाप्रमाणे यंदाही केळझर कृती समितीच्या वतीने धरणाच्या पाण्याचे जलपूजन करण्यात आले. धरण पूर्ण भरल्यामुळे परिसरातील शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे. यावेळी कैलास बोरसे, राकेश मोरे, कडू मोरे, केदा मोरे, महादू सावकार, बाजीराव देवरे, योगेश सोनवणे, विजय मोरे, अशोक सोनवणे, जगन्नाथ बिरारी, अरुण वाघ, योगेश सोनवणे, देवीदास सावकार, लाला मोरे, भिला बागुल आदिंसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केळझर धरणाचे जलपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 8:04 PM