डांगसौंदाणे येथे केळझर धरणावर जलपूजन करताना आमदार दीपिका चव्हाण, संजय चव्हाण व इतर मान्यवर.डांगसौंदाणे : बागलाणच्या पश्चिम पट्ट्यास वरदान ठरलेले केळझर (गोपाळसागर) धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, सोमवारी बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण, माजी आमदार संजय चव्हाण व मान्यवरांच्या हस्ते विधिवत जलपूजन करण्यात आले. सद्यस्थितीत धरणाच्या सांडव्यावरून सुमारे ५० क्यूसेक पाणी आरम नदीपात्रात विसर्ग होत आहे.यावेळी गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे, पाटबंधारे उपविभागीय अभियंता एस.पी. पाटील, सटाणा बागायतदार संघाचे अध्यक्ष झिप्रू सोनवणे, चौंधाणे पाणीवापर संस्थेचे अध्यक्ष केदा मोरे, तुळजाभवानी एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष संजय सोनवणे, मविप्रचे उपसभापती नानाजी दळवी, शैलेश सूर्यवंशी, पांडुरंग सोनवणे, आनंद सोनवणे, किरण सोनवणे, धर्मा सोनवणे, जिभाऊ सोनवणे, मधुकर अहिरे, नारायण सोनवणे, सुरेश सोनवणे, उषा भामरे, शाखा अभियंता संजय पाटील, आर. बी. सूर्यवंशी, आर. के. निकम आदींसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केळझर धरणाचे जलपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2017 11:27 PM