घोटी : उन्नत शेती समृद्ध शेतकरी योजनेंतर्गत ८ जूनपर्यंत कृषी तंत्रज्ञान प्रचार व प्रसार अभियान राबविण्यात येत आहे. इगतपुरी तालुक्यातील १२६ गावांमध्ये गावोगावी शेतकरी मेळावे आणि बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यात खरिपातील मुख्य पिके भात, नागली, वरई व सोयाबीन यांची लागवड तंत्रज्ञान, पीक संरक्षण उपायांबाबत माहिती देण्यात येणार आहे.तालुक्यातील मुख्य खरीप पीक भात असून, या पिकाचे चार सूत्रीप्रमाणे लागवड, यामध्ये भात तूस वापर, गिरी पुष्पचा वापर, ओळीत लागवड व युरिया डीएपी ब्रिकेटचा वापर करण्याबाबत मार्गदर्शन सुरू आहे. भात पिकातील तणभात (रात) निर्मूलन बीजप्रक्रि या, गादी वाफ्यावर रोपवाटिका तयार करणे आणि करपा व तपकिरी तुडतुडे याबरोबरच कीड व रोगांचा नियंत्रणाच्या उपाययोजनां बाबत जागृती केली जात आहे.रायांबे येथे महिला शेतीशाळा आणि शेतकरी मेळावा घेण्यात आला. यावेळी उपस्थित महिला व इतर शेतकऱ्यांना खरिपातील भात, नागली, वरई पिकांच्या लागवडीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. घडी पत्रिकांचे वाटपही करण्यात आले, विविध योजनांची माहिती तालुका कृषी अधिकारी संजय शेवाळे यांनी दिली. कार्यक्र मप्रसंगी उपसरपंच प्रमिला भोर, गोकुळ भोर, रमेश धांडे, अनिल धांडे, उषा धांडे, कैलास बिडवे, निर्मला भोर, कविता धांडे, कृषी सहायक दीपक भालेराव, सुहास भालेराव, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक हितेंद्र मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
इगतपुरीत शेतकरी जनजागृती पंधरवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 12:48 AM
घोटी : उन्नत शेती समृद्ध शेतकरी योजनेंतर्गत ८ जूनपर्यंत कृषी तंत्रज्ञान प्रचार व प्रसार अभियान राबविण्यात येत आहे. इगतपुरी तालुक्यातील १२६ गावांमध्ये गावोगावी शेतकरी मेळावे आणि बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यात खरिपातील मुख्य पिके भात, नागली, वरई व सोयाबीन यांची लागवड तंत्रज्ञान, पीक संरक्षण उपायांबाबत माहिती देण्यात येणार आहे.
ठळक मुद्दे कीड व रोगांचा नियंत्रणाच्या उपाययोजनां बाबत जागृती केली जात आहे.