मालेगाव : नवीन महाराष्टÑ घडविण्याचे स्वप्न घेऊन जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात केली आहे. जनतेच्या मनात व हृदयात काय आहे हे जाणून घ्यायचे आहे. ही यात्रा मुख्यमंत्री घडवायला नाही, तर महाराष्टÑ घडविण्यासाठी सुरू करण्यात आली असल्याचे प्रतिपादन युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.शिवसेनेच्या जनआशीर्वाद यात्रेचे शुक्रवारी (दि.१९) नाशिक जिल्ह्यात आगमन झाले. मालेगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. प्रारंभी आदित्य ठाकरे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते अतिक्रमण नियमनाकुल लाभार्र्थींना आदेश, संजय गांधी लाभार्र्थींना मंजुरी पत्र व वाचन संस्कृतीवाढीसाठी पुस्तकांचे वाटप करण्यात आले.आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, सध्या निवडणुका नाहीत किंवा प्रचारसभादेखील नाहीत. तरीदेखील शिवसैनिक व तरुणांची गर्दी पाहता हा विजयी मेळावा असल्याचे वाटत आहे. राज्यातील विकासकामांना वेग द्यायचा आहे. तरुणाईला सोबत घेऊन नवीन महाराष्टÑाचा आवाज बुलंद करायचा आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणुकीमुळे कोणावर अन्याय होणार नाही असा महाराष्टÑ घडवायचा आहे. सध्या दुष्काळी स्थिती आहे. काही ठिकाणी शाळा, रुग्णालयांमध्ये पुरेशा सुविधा मिळत नाहीत. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याच्या अटीवरच भाजपशी युती करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ मिळवून दिला जाईल, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले. यावेळी उत्तर महाराष्टÑातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी युवा नेते ठाकरे यांना रिकामा कलश देण्यात आला आहे. सुरगाणा तालुक्यातील पश्चिम वाहिनी नद्या पूर्व वाहिनी करून उत्तर महाराष्टÑाला सुजलाम् सुफलाम् करावे. रिकामा कलश भरून द्यावा, अशी मागणी ग्रामविकासमंत्री दादा भुसे यांनी ठाकरे यांच्याकडे केली. यावेळी विविध संघटनांच्या पदाधिकाºयांनी आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन निवेदने सादर केली. सूत्रसंचालन तालुकाप्रमुख अॅड. संजय दुसाने यांनी केले. दरम्यान, सभेपूर्वी शिवशाहीर विजय तनपुरे यांनी पोवाडे सादरकेले.मालेगाव बाह्यमधून उमेदवारी करावी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना मालेगाव बाह्य मतदारसंघातून उमेदवारी करावी, असे साकडे घातले. एक लाखाच्या मताधिक्याने किंवा बिनविरोध निवडून देऊ, असे सांगताच उपस्थित शिवसैनिक व पदाधिकाºयांनी जल्लोष करत आदित्य ठाकरेंना उमेदवारी करण्याचे साकडे घातले.च्मनमाड येथे ढोलताशांच्या गजरात ठाकरे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. शेतकºयांनी अडचणीच्या काळात फक्त शिवसेनेला आवाज द्या, तुमच्या अडचणी सोडविण्यासाठी शिवसेना कटिबद्ध राहील, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी येथील सभेत बोलताना व्यक्त केला.
जनआशीर्वाद यात्रा मुख्यमंत्रिपदासाठी नव्हे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 1:39 AM
नवीन महाराष्टÑ घडविण्याचे स्वप्न घेऊन जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात केली आहे. जनतेच्या मनात व हृदयात काय आहे हे जाणून घ्यायचे आहे. ही यात्रा मुख्यमंत्री घडवायला नाही, तर महाराष्टÑ घडविण्यासाठी सुरू करण्यात आली असल्याचे प्रतिपादन युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.
ठळक मुद्देआदित्य ठाकरे : मालेगाव येथील सभेत प्रतिपादन; सरसकट कर्जमाफीसाठीच भाजपशी युती