लोकमत न्यूज नेटवर्कअंदरसुल : येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी तपोभूमी असलेल्या पुरातन नागेश्वर महादेव मंदिर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भक्तांविना सुनेसूने झाले आहे.श्रावण महिन्यात विविध भागातून भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. कोरोनामुळे या श्रावण महिन्यात मंदिर बंद असल्याने भाविकांची वर्दळ कमी झाली आहे. अंदरसुल गावातील प्रत्येक मंदिरात श्रावणात अहोरात्र भजन, कीर्तने, पारायण, सप्ताह आदी धार्मिक कार्यक्र म होत असतात मात्र, कोरोनामुळे यंदा सर्व धार्मिक कार्यक्र म बंद असल्याने गावात शांतता पसरली असून भक्तांचा हिरमोड झाला आहे.दरम्यान, तपोभूमी नागेश्वर महादेव मंदिरात जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज यांनी भेट देऊन नागेश्वर मंदिरात अभिषेक व पूजा केली.
जनार्दन स्वामींची तपोभूमी सुनीसूनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 3:07 PM
अंदरसुल : येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी तपोभूमी असलेल्या पुरातन नागेश्वर महादेव मंदिर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भक्तांविना सुनेसूने झाले आहे.
ठळक मुद्देअंदरसुल : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व कार्यक्रम रद्द