शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

जनस्थान आयकॉन पुरस्कार

By admin | Published: June 24, 2017 12:35 AM

‘जनस्थान’ या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पं. सुभाष दसककर, विद्या देशपांडे विद्या करंजीकर यांना ‘जनस्थान आयकॉन’ पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : नाशिकच्या कलावंतांमध्ये ‘सत्शील’ माणूस दडलेला आहे. आपल्याच लोकांचा गौरव करून त्यांना प्रोत्साहित करणे आणि त्यांच्या आनंदात आपण आनंद मानणे हे क्वचित घडते, अशीच वृत्ती सगळ्या कलावंतांमध्ये वाढण्याची आवश्यकता आहे, असे मत दिग्दर्शक राजदत्त यांनी शुक्रवारी (दि. २३) ‘जनस्थान आयकॉन’ पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी व्यक्त केले.परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे ‘जनस्थान’ या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ग्रुपमधील सदस्य पं. सुभाष दसककर, विद्या देशपांडे आणि विद्या करंजीकर यांना ‘जनस्थान आयकॉन’ पुरस्काराचे राजदत्त यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी बोलताना राजदत्त यांनी जनस्थान या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपच्या विविध उपक्रमांची प्रशंसा करताना कलाकारांमध्ये याप्रकारे झालेले परिवर्तन नाशिकपुरते मर्यादित न राहता संपूर्ण समाजात रुजायला हवे आणि यामुळे समाज श्रीमंत होण्यास मदत होईल, प्रत्येकाला नि:संकोचपणे श्रेय देणे हे मानवी प्रगल्भतेचे लक्षण आहे आणि मन अधिक प्रग्ल्भ आणि सशक्त होण्याची समाजाला गरज असल्याचे राजदत्त यांनी यावेळी सांगितले. जनस्थान हा व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप निर्मितीची संकल्पना राबविणाऱ्या ग्रुपचे अ‍ॅडमिन अभय ओझरकर, स्वानंद बेदरकर आणि विनोद राठोड यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात नाट्य नांदीने झाली आणि कार्यक्रमाची सांगता आशिष रानडे यांनी सादर केलेल्या गाण्याने झाली. या पुरस्कार सोहळ्याप्रसंगी जनस्थान व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपतर्फे राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची तसेच ‘जनस्थान आयकॉन’ पुरस्कार प्राप्त कलावंतांचा जीवनपट उलगडून सांगणारी ध्वनिचित्रफीत दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वानंद बेदरकर यांनी केले. शनिवारी (दि. २४) ‘सृजन’ या नृत्याविष्काराने या फेस्टिव्हलची सांगता होणार असून, यामध्ये विद्या देशपांडे, सुमुखी अथणी आणि कीर्ती भवाळकर यांचा नृत्याविष्कार कलाकारांना अनुभवता येणार असून, या फेस्टिव्हलला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.