शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

मधु मंगेश कर्णिक यांना जनस्थान पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 4:33 AM

नाशिक : प्रख्यात ज्येष्ठ साहित्यिक आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांना यंदाचा प्रतिष्ठेचा जनस्थान पुरस्कार ...

नाशिक : प्रख्यात ज्येष्ठ साहित्यिक आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांना यंदाचा प्रतिष्ठेचा जनस्थान पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दर दोन वर्षांनी दिला जाणारा हा पुरस्कार यंदा १० मार्चला प्रदान करण्यात येणार असल्याचे पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष ॲड.विलास लोणारी यांनी सांगितले.

कुसुमाग्रज स्मारकात झालेल्या पत्रकारपरिषदेत ही घोषणा करण्यात आली. या प्रतिष्ठेच्या पुरस्काराचे स्वरूप १ लाख रुपये, सन्मानपत्रक आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. दरवर्षी हा पुरस्कार कुसुमाग्रजांच्या जयंतीला अर्थात २७ फेब्रुवारीला प्रदान केला जातो. मात्र, यंदा प्रथमच हा पुरस्कार १० मार्चला प्रदान केला जाणार असल्याचे ॲड.लोणारी यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर कार्यवाह मकरंद हिंगणे, विश्वस्त आर्कि. संजय पाटील, अरविंद ओढेकर आदी मान्यवर उपस्थित होते. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचे स्नेही पद्मश्री मधु मंगेश कर्णिक हे कथाकार, कादंबरीकार, कवी, संवादलेखक म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. ज्येष्ठ कवी केशवसुत यांचे कोकणातील मालगुंड येथे स्मारक उभारणीत मधु मंगेश कर्णिक यांचे मोठे योगदान होते. गोवा शासनाच्या प्रसिद्धी खात्यात माहिती अधिकारी, मुंबईला राज्य शासनाचे जनसंपर्क अधिकारी, तसेच काही काळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे प्रसिद्धी अधिकारी म्हणूनही त्यांनी कामकाज केले. १९९० साली रत्नागिरीत झालेल्या ६४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदाचा मानही त्यांना मिळाला असून, ग.दि. माडगूळकर प्रतिष्ठानच्या गदीमा पुरस्कारानेही त्यांना २०१० साली गौरविण्यात आले आहे, तसेच २०१४ ते २०१९ या काळात कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. अनेक कथासंग्रहांसह करुळचा मुलगा हे त्यांचे आत्मचरित्रही प्रसिद्ध आहे. पुरस्कार घोषणेप्रसंगी विश्वस्त गुरुमीत बग्गा, ॲड.अजय निकम, प्रा.हर्षवर्धन कडेपूरकर आदी मान्यवर उपस्थित होते. या पुरस्कार निवड समितीत विजय कुवळेकर, नीलिमा गुंडी, बाळकृष्ण कवठेकर, संतोष शेणई, प्रफुल्ल शिलेदार, मुकुंद संगोराम, शेखर गोडबोले, डॉ.विलास खोले, नीरजा यांचा समावेश होता.

इन्फो

माजी अध्यक्षांना प्रथमच जनस्थान

कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष असलेल्या कर्णिक यांना यंदाचा पुरस्कार जाहीर झाल्याने, प्रथमच प्रतिष्ठानच्या एका माजी अध्यक्षास हा पुरस्कार दिला जाणार आहे. यापूर्वी जनस्थान पुरस्कार विजय तेंडुलकर ( १९९१), विंदा करंदीकर ( १९९३), श्रीमती इंदिरा संत (१९९५), गंगाधर गाडगीळ ( १९९७), व्यंकटेश माडगूळकर (१९९९), श्री. ना. पेंडसे (२०११), मंगेश पाडगावकर ( २००३), नारायण सुर्वे (२००५), बाबुराव बागुल (२००७), ना. धों. महानोर (२००९), महेश एलकुंचवार (२०११), भालचंद्र नेमाडे ( २०१३), अरुण साधू (२०१५), विजया राजाध्यक्ष (२०१७), वसंत आबाजी डहाके (२०१९) यांना प्रदान करण्यात आला होता.

इन्फो

गोदा गौरव २७ फेब्रुवारीला

कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दर दोन वर्षांनी दिला जाणारा गोदावरी गौरव सन्मान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी पुढे ढकलण्यात आला होता. तो पुरस्कार यंदा २७ फेब्रुवारीला प्रदान करण्यात येणार आहे. त्यात डॉ.माधव गाडगीळ (विज्ञान), भगवान रामपुरे (शिल्प), श्रीगौरी सावंत (लोकसेवा), दर्शना जव्हेरी (नृत्य), सई परांजपे (चित्रपट), काका पवार (क्रीडा) यांचा सन्मान केला जाणार आहे.