शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
3
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
4
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
5
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
6
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
7
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
8
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
9
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
10
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
11
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
12
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
14
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
15
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
16
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
17
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
18
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
19
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
20
Gold-Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट

जनस्थान फेस्टिव्हलला गुरुवारपासून सुरुवात

By admin | Published: June 19, 2017 1:50 AM

जनस्थान फेस्टिव्हलला गुरुवारपासून सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : ‘जनस्थान’ या व्हॉट््सअ‍ॅप ग्रुपच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवार (दि. २२)पासून तीन दिवसीय ‘जनस्थान फेस्टिव्हल’चे परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे करण्यात आले आहे. या फेस्टिव्हलनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम, पुरस्कार प्रदान सोहळा, चित्रशिल्प प्रदर्शन अशा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या फेस्टिव्हल अंतर्गत ग्रुपचे सदस्य दिवंगत तबला वादक प्रमोद भडकमकर यांना मरणोत्तर ‘जनस्थान आयकॉन’ पुरस्कार जाहीर करण्यात आला असून, प्रा. डॉ. मो. स. गोसावी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे तसेच राष्ट्रीय पातळीवर नाशिकचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संगीत आणि अभिनय क्षेत्रात आपला ठसा उमटविलेल्या पं. सुभाष दसककर, विद्या देशपांडे आणि विद्या करंजीकर यांना यावर्षीचा ‘जनस्थान आयकॉन’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. फेस्टिव्हलच्या पहिल्याच दिवशी ‘समर्पण’ या कार्यक्रमातून प्रमोद भडकमकर यांना सांगितिक कार्यक्रमातून मानवंदना देण्यात येणार आहे, तर दुसऱ्या दिवशी ‘सन्मान’ या कार्यक्रमादरम्यान ‘जनस्थान आयकॉन’ पुरस्काराचे ख्यातनाम सिनेदिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते वितरण करण्यात येणार आहे. फेस्टिव्हलच्या तिसऱ्या दिवशी ‘सृजन’हा नृत्याविष्कार सादर होणार असून, यात विद्या देशपांडे, सुमुखी अथणी आणि कीर्ती भवाळकर या कथक नृत्य सादर करणार आहेत. त्यांना मोहन उपासनी, आशिष रानडे, नितीन पवार साथसंगत करणार आहेत.या महोत्सवात समावेश असणार आहे. पहिल्या दिवशी होणाऱ्या समर्पण या कार्यक्रमात नितीन पवार, नितीन वारे, सतीश पेंडसे, सुजीत काळे, दिगंबर सोनवणे आणि वैष्णवी भडकमकर हे तबलावादन करणार आहे आणि प्रमोद भडकमकर यांनी ज्यांना साथसंगत केली ते सुभाष दसककर, अविराज तायडे, मकरंद हिंगणे, अनिल दैठणकर, विद्या देशपांडे, कीर्ती भवाळकर, मोहन उपासनी हे कलावंत सहभागी होणार आहेत, तर दुसऱ्या दिवसाची सुरुवात पारंपरिक नांदीने होणार आहेत आणि यात आशिष रानडे, ज्ञानेश्वर कासार, आनंद अत्रे, रागिणी कामतीकर, विद्या कुलकर्णी, गीता माळी, प्राजंली बिरारी, नवीन तांबट, सतीश पेंडसे, दिगंबर सोनवणे आदी कलावंत सहभागी होणार असून, या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.‘संभव’ चित्रशिल्प प्रदर्शनाचे आकर्षणजनस्थान फेस्टिव्हल दरम्यान तीनही दिवशी ‘संभव’ या चित्रशिल्पाचा आनंद नागरिकांना घेता येणार असून, या प्रदर्शनाचे उद्घाटन पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या प्रदर्शनात राजेश सावंत, प्रफुल्ल सावंत, नंदू गवांदे, सी. एल. कुलकर्णी, अनिल माळी, प्रसाद पवार, केशव कासार, संदीप लोंढे, यतिन पंडित, श्याम लोंढे, स्नेहल एकबोटे, शीतल सोनवणे, श्रेयस गर्गे या कलावंतांचे चित्रशिल्प मांडण्यात येणार आहे.