मालेगाव : इंधन दरवाढीच्या निषेधार्थ जनता दलाने येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सायकल फेरी काढून अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांना निवेदन सादर करण्यात आले. सर्वसामान्य नागरिक, नोकरदार, शेतकरी, यंत्रमागधारक केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे अडचणीत सापडले आहेत. पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. आंतरराष्टÑीय बाजारात कच्चा तेलाचे भाव घसरत असताना पेट्रोल व डिझेलची दरवाढ केली जात आहे. या दरवाढीचा येथील यंत्रमाग व्यवसायावरही परिणाम झाला आहे, असे निवेदनात म्हटले आहे. इंधन दरवाढीच्या निषेधार्थ येथील पदाधिकाऱ्यांनी शहरातील जनता दल कार्यालय ते अपर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सायकल रॅली काढून निषेध नोंदविला. या फेरीत मोहंमद इद्रीस मो. जलीम, जाहीदबाबा, अफताब आलम, सलीम गडबड, हारुण अन्सारी, इम्रान अन्सारी, जावेद हसन निहाल अहमद, मोमीन मोईन अख्तर आदिंसह पदाधिकारी सहभागी झाले होते.
इंधन दरवाढी निषेधार्थ जनता दलाची सायकल फेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 12:14 AM