नाशिकरोड : पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल दहावीचा निकाल १०० टक्के लागला. ३०८ विद्यार्थ्यांपैकी १५७ विद्यार्थ्यांना विशेष प्रावीण्य, १४२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. शाळेत प्रथम सत्यजित बोराडे (९७.६०) व कृष्णा टिळे (९७.६०) टक्के गुण मिळाले आहेत. द्वितीय सार्थक गवते (९६.४०) टक्के गुण मिळवले आहेत.
आदर्श विद्यामंदिर शाळा
नाशिकरोड : समता समाज विकास संस्था संचलित आदर्श विद्या मंदिर शाळेचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला. विशेष श्रेणीत २७ विद्यार्थी, प्रथम श्रेणीत-५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. प्रथम इमरान अकिल अन्सारी, द्वितीय अंजुम जावेद शेख, तृतीय अनुष्का सुनील पुंड, चतुर्थ श्रद्धा समाधान पाटील, पाचवी शिवानी सुनील बाचकर टक्के गुण मिळविले आहेत.
रवींद्रनाथ विद्यालय
नाशिक : रवींद्रनाथ विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागलेला आहे. अभिषेक ओंकार पाटील शाळेतून प्रथम व मोक्ष ओगले, संजय शेमगे, सोपान सातपुते द्वितीय व कुमारी वैष्णवी शिंगटे तृतीय क्रमांक मिळवलेला आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे अध्यक्ष मनोज पिंगळे, मुख्याध्यापिका पुष्पा काळे उपमुख्याध्यापक रावसाहेब पाटील यांनी मार्गदर्शन केले होते.
डीएफडी माध्यमिक विद्यालय
नाशिकरोड : जेलरोड येथील गणेश धात्रक शिक्षण संस्थेच्या डीएफडी माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला. शाळेत आलेले पहिले पाच विद्यार्थी - सृष्टी कमलसिंह यादव, राधिका सुधीर भंडारे, समीक्षा मच्छींद्र निकम, खुशाल विकास निकम, नरेंद्र भरत डंबाळे विशेष श्रेणीमध्ये ३०, प्रथम श्रेणीत ३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
के.जे. मेहता हायस्कूल
नाशिकरोड : येथील के. जे. मेहता हायस्कूलमध्ये दहावीच्या परीक्षेत स्वप्निल प्रदीप जाधव प्रथम आला आहे.
शाळेत दहावीच्या परीक्षेला २२८ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. त्यापैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. १५ विद्यार्थी विशेष श्रेणीत, ८३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत आणि १३० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.
होरायझन अकॅडेमीत युथ डे साजरा
पंचवटी : मखमलाबाद येथिल होरायझन अकॅडेमीत युथ डे साजरा केला. या निमित्ताने प्रायमरी, सेकंडरीच्या विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी घेण्यात आल्या. यावेळी युथ डेची माहिती आरती पारधी यांनी सांगून त्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले व आपल्या अंगी असलेल्या कौशल्याचे महत्त्व सांगितले. टाकाऊपासून टिकाऊ कसे बनवू शकते पटवून दिले.
होरायझन अकॅडेमीत सहविचार सभा
पंचवटी : मखमलाबाद मराठा विद्या प्रसारक समाजाच्या होरायझन अकॅडेमी येथे शालेय समिती सहविचार सभा नुकतीच संपन्न झाली. सभेत प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मविप्र संचालक सचिन पिंगळे होते. अध्यक्षस्थानी होरायझन अकॅडेमी मखमलाबाद स्कूल कमिटीचे अध्यक्ष संजय फडोळ होते. या सहविचार सभेत नूतन इमारतीत स्थलांतर करणे, नवीन तंत्रज्ञान विषयक चर्चा करून त्यातून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त ज्ञान कसे देता येईल विषयी मार्गदर्शन देण्यात आले.