शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
2
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
3
PM नरेंद्र मोदींचा जगात डंका; आता गयाना आणि बार्बाडोसकडून 'सर्वोच्च सन्मान' जाहीर!
4
अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: 1962 ते 2019... प्रत्येक निवडणुकीत अपक्षांनी किती मते खाल्ली?
7
कश्मिरा शाहची अपघातानंतर दिसली पहिली झलक, लांबलचक पोस्ट शेअर करत म्हणाली...
8
'धारावी प्रोजेक्ट'मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता; शरद पवारांनी विषयच निकाली काढला
9
"मी यावेळी मतदान करु शकणार नाही...", मराठमोळ्या अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट
10
Lawrence Bishnoi : "लॉरेन्स बिश्नोई रोज सकाळी १०८ वेळा..."; वकिलाने सांगितल्या गँगस्टरच्या काही खास गोष्टी
11
"पक्षापेक्षा जास्त उमेदवाराचा विचार!" मनवा नाईकने केलं मतदान, म्हणाली, "स्थिर सरकार..."
12
तुम्हाला माहितीये का, भारतात रस्त्यावर धावणाऱ्या सर्वाधिक ई-बसेस कोणत्या कंपनीच्या?
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निवडणुकीदिवशीच सोलापुरात ठाकरे गटाला धक्का! सुशीलकुमार शिंदेंचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
14
६ महिन्यांत 'या' शेअरमध्ये ५६५% ची वाढ; आता बोनस शेअर देण्याची तयारी, कोणता आहे स्टॉक?
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
16
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
17
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...
18
शिंदेंच्या शिवसेनेकडून बनावट पत्र, राज ठाकरे संतापले; "वरळीकर मतदार सूज्ञ..." 
19
चंदा कोचर यांच्याविरोधात कारवाई करू नका, उच्च न्यायालयाचे एसएफआयओला निर्देश 
20
"१०:३० वाजता मतदानाला गेले, फक्त तीनच लोक", रस्त्यांची दुरवस्था दाखवत बॉलिवूड अभिनेत्री म्हणते- "जर तुम्हाला..."

लोकार्पण : मुस्लिम समाजाला मनपाकडून प्रथमच मिळाले 'जनाजा रथ'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 7:54 PM

नाशिक : जुने नाशिकपासून लांब अंतरावर राहणाऱ्या मुस्लीम बहुल भागातील मृतदेह जुनी नाशकातील जहांगीर, रसुलबाग कब्रस्तानपर्यंत आणताना अडचणींचा सामना ...

ठळक मुद्देशहर ए खतीब यांनी केले फातेहापठणजनाजा रथची उणीव प्रकर्षाने जाणवत होतीदफनविधी साहित्य मनपाकडून मोफत पुरविले जाते

नाशिक : जुने नाशिकपासून लांब अंतरावर राहणाऱ्या मुस्लीम बहुल भागातील मृतदेह जुनी नाशकातील जहांगीर, रसुलबाग कब्रस्तानपर्यंत आणताना अडचणींचा सामना करावा लागत होता. यामुळे समाजाकडून मुस्लीम जनाजा वाहतूक वाहन उपलब्ध व्हावे, अशी मागणी होत होती. मनपाच्या वतीने दोन वाहने (जनाजा रथ) उपलब्ध करून देण्यात आली. या वाहनांचे शुक्रवारी नमाजनंतर जहांगीर कब्रस्तान प्रवेशद्वारावर लोकार्पण करण्यात आले. यावेळी शहर ए खतीब हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांनी फातेहापठण करून विशेष दुवा मागितली.शहरातील मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच मनपाने 'जनाजा रथ' उपलब्ध करून दिले. यासाठीनगरसेवक मुशीर सय्यद यांनी पाठपुरावा करत महासभेत ठराव मांडला व महासभेने तो मंजूर करून घेतला. सुमारे 35 ते 40 हजार रुपये खर्च करून महिंद्र हेव्ही ड्यूटी मिनी ट्रक ही वाहने खरेदी करण्यात आली आणि त्याची वैशिष्ट्यपूर्ण रचना करून जनाजा वाहून नेण्यासाठी वाहन तयार केले. मोफत अंत्यविधी प्रमाणेच दफनविधी साहित्य मनपाकडून पुरविले जाते. मुस्लिम समाजासाठी जनाजा रथची उणीव प्रकर्षाने जाणवत होती, म्हणून मनपा प्रशासनाकडे लोकप्रतिनिधी या नात्याने पाठपुरावा केला. महासभेत प्रस्ताव मांडला आणि तो मंजूर झाला यामुळे समाजाची मोठी समस्या सुटण्यास मदत झाली, असे सैय्यद यावेळी म्हणाले. आज हजरत सय्यद इमाम शाह बाबारोड येथील जहांगीर कब्रस्तानच्या प्रवेशद्वाराजवळ फातेहापठण होऊन जनाजा वाहनांचे लोकार्पण झाले. यामध्ये मृतदेहाचा जनाजा ठेवण्यासाठी मजबूत स्टँड बनविण्यात आला आहे. नातेवाईकांना उभे राहण्यासाठी व दफनविधी साहित्य ठेवण्यासाठी मुबलक जागा आहे. जुने नाशिक भागात मुस्लीम समाजाचे मोठे कबरस्तान आहेत. त्यामुळे सातपूर, अंबड, नाशिकरोड, पंचवटी, वडाळागाव, अशोका मार्ग, पखालरोड, भारतनगर, भाभानगर आदी परिसरातील मुस्लीम मृतदेह राहत्या घरापासून कब्रस्तानपर्यंत दफनविधी करिता नेण्यासाठी हे रथ उपयोगी ठरणार आहेत. आज झालेल्या फातेहाखॉनी प्रसंगी शहर -ए- काझी मोईजोद्दीन सैय्यद, एजाज काझी, गुलशने तैबा मशिदीचे नायब इमाम अब्दुल सलाम, रिजवान खान आदी मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाMuslimमुस्लीमIslamइस्लाम