दिंडोरी तालुक्यातील जानोरी हे गाव पेसाअंतर्गत असून, या गावात पन्नास टक्के आदिवासी लोकसंख्या आहे. गावची लोकसंख्या अंदाजे दहा हजारांच्या वर आहे. गाव मोहाडी आरोग्य केंद्रांतर्गत येत असल्याने, प्रत्येक गुरुवारी जानोरी येथे जिल्हा परिषद मराठी शाळेत लसीकरण केले जाते. या लसीकरणासाठी प्रत्येक वेळी १०० लसी दिल्या जातात. त्यातील ५० लसी जळुऊके दिंडोरी या गावातील ग्रामस्थांसाठी पाठविल्या जातात. दहा हजार लोकसंख्या असलेल्या गावाला दीडशे ते दोनशे लसी दिल्या गेल्या, तरच पूर्ण गावाचे लसीकरण होऊ शकते, त्यासाठी दोन वर्षे लागतील, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
प्रत्येक गुरुवारच्या दिवशी लसीकरण असताना, गावासाठी फक्त पन्नास लसी मिळतात, म्हणून ग्रामस्थ पहाटे पाच वाजताच आपल्याला लस मिळावी, म्हणून नंबर लावून तासन् तास उभे असतात.
कोट....
जानोरी गावासाठी शासनाने दीडशे ते दोनशे ग्रामस्थांना लसीकरण होईल, अशा प्रमाणात लस पुरविण्यात यावी. त्यामुळे ग्रामस्थांचे हाल होणार नाहीत. मोठ्या दहा हजार लोकसंख्येच्या गावाचे लसीकरण लवकरात लवकर होईल, यासाठी प्रयत्न व्हावेत.
- विष्णुपंत काठे, माजी उपसरपंच, जानोरी