नाशिक : राज्याचे राज्यपाल पी. विद्यासागर राव हे जानेवारी २०१५ ला नाशिक दौऱ्यावर येत असून, पेसा अंतर्गत कायद्यातील तरतुदीचंी व अंमलबजावणीची ते माहिती घेणार असून, पेठ तालुक्यात भेट देणार आहेत. राज्यपालांच्या दौऱ्याची तयारी करण्यासाठी येत्या १३ डिसेंबर २०१४ रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी जिल्'ातील सर्व गटविकास अधिकारी व खातेप्रमुखांची स्वंतत्र बैठक बोलविली असून, त्या बैठकीत विविध विषयांचा ते आढावा घेणार आहेत. बनकर खातेप्रमुखांच्या घेणार असलेल्या आढावा बैठकीत १६ विषयांचा आढावा घेणार आहेत. त्यात गटविकास अधिकाऱ्यांचा मासिक गुणांकन आढावा, स्वच्छ भारत अभियान / निर्मल ग्राम अभियान पुरस्कार प्रस्ताव, संपूर्ण स्वच्छता अभियानअंतर्गत वितरीत अनुदान, त्यांचा खर्च आणि विनीयोग दाखले, पाणीटंचाई कृती आराखडा व त्याची अंमलबजावणी, कुपोषण निर्मूलनासाठीच्या प्रतिबंधक उपाययोजना आढावा, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना अंमलबजावणी / १०० कोटी वृक्ष लागवडीचा आढावा, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आढावा, दलीतवस्ती सुधारणा कार्यक्रम पूर्ण/अपूर्ण कामांचा आढावा यासह विविध प्रकारच्या १६ मुद्द्यांवर आढावा घेणार आहेत. तसेच राज्यपालांच्या दौऱ्याबाबत आवश्यक ते नियोजन करण्याच्या दृष्टीने चर्चा या बैठकीत करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यापूर्वीही जिल्'ात दोन वेळा राज्यपालांचा नियोजित दौरा ऐनवेळी रद्द झाला असल्याने या दौऱ्याविषयी अधिकारी व लोकप्रतिनिधींना कुतूहल निर्माण झाले आहे.(प्रतिनिधी)
जानेवारी राज्यपाल नाशिकच्या दौऱ्यावर पेठ तालुक्यात देणार भेट, यंत्रणेची धावपळ
By admin | Published: December 10, 2014 1:07 AM