कौळाणे (गा.) : परिसरामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात लाल कांद्याची लागवड करण्यात येते. यंदा मात्र जोरदार पावसाअभावी लागवड खोळंबली असून, शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. निसर्ग कसोटीच घेत असल्याची भावना परिसरातील शेतकºयांमध्ये निर्माण होत आहे. यंदा सुरुवातीला चांगला पाऊस झाला; मात्र पेरण्या झाल्यानंतर पावसाने दांडी मारली. मध्यंतरी बाजरी, मका, कपाशी आदी पिकांना दिलासा मिळेल एवढाच पाऊस आला. अद्यापही दमदार पाऊस आला नसल्याने विहिरींना पाणी उतरले नाही. कांद्याची रोपे लागवडीसाठी तयार असून, लागवडीस प्रारंभ करता येत नाही. माळमाथा परिसरातील शेतकºयांचे कांदा पीक प्रमुख मानले जाते. येथील शेतकºयांची आर्थिक गणितं कांद्यावर अवलंबून आहे. येथील शेतकरी कांदा लागवडीसाठी सज्ज झाले असून, जोरदार पावसाअभावी लागवड खोळंबली आहे. माळमाथा परिसरातील कौळाणे, वनपट, अस्ताणे, टिंघरी आदी भाग पर्जन्यछायेचा भाग म्हणून ओळखला जातो. दुष्काळ पाचवीला पूजला असून, जलसिंचनाच्या अपुºया सोयींमुळे या भागातील शेती पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे.माळमाथा परिसरातील शेतकºयांचे प्रमुख पीक म्हणून कांद्याकडे पाहिले जाते. येथील आर्थिक गणित कांदा पिकावर अवलंबून असल्याने येथील शेतकरी कांदालागवडीसाठी सज्ज झाले आहे. मात्र जोरदार पावसाअभावी लागवड खोळंबली आहे. एकीकडे जिल्ह्याच्या बहुतेक भागात चांगला पाऊस पडत असताना या पट्ट्यात पावसाची रिमझिम सुरू आहे. यामुळे कळवण, सटाणा, मालेगाव,देवळा परिसरातील बळीराजा जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
जोरदार पावसाअभावी कांदा लागवड रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 12:01 AM