नाशिकरोड : कुठल्याही स्पर्धेत जिद्द आणि मेहनतीने काम केले तर यश हमखास मिळेल, नॅक फाउण्डेशनने आयोजित केलेल्या मॅरेथॉन स्पर्धेचा उपक्रम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी केले. नाशिकरोड येथे नॅक फाउण्डेशनच्या वतीने बुधवारी सकाळी बिटको चौकापासून आयोजित मिनी मॅरेथॉन स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी सिंघल बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे, लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त मोहन ठाकूर, प्रशिक्षक वीरेंद्र सिंग, आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत, मोनिका आथरे, संजीवनी जाधव, ताई बामणे, तिसर तडवी, महेश तुंगार, बाला गोविंद, अनिल वाघ, नितीन सुर्वे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत, संजय देशमुख, मुद्रणालय कामगार नेते जगदीश गोडसे, सिद्धार्थ पवार, फाउण्डेशनचे अध्यक्ष राजेंद्र साळवे, कलीम शेख, अॅड. अंकिता मुदलियार आदि उपस्थित होते. विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. सूत्रसंचालन रोशनी केदारे, रंजना सोनवणे यांनी केले. आभार करुणा आव्हाड यांनी मानले. यावेळी रमेश जाधव, नितीन भालेराव, प्रकाश शिरसाठ, पिअर गोन्सावलीस, हेमंत सोनवणे, गणेश काळे, अमोल जगताप, कनकराज पिल्ले, गणेश कुलथे, राजेश जाधव, गोविंद साळवे, अमोल जगताप, महेंद्र साळवे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
नाशिकरोड मिनी मॅरेथॉन स्पर्धेत जसबीरसिंग, मंजू शहाणे विजेते
By admin | Published: January 18, 2017 11:54 PM