वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या जातेगाव बुद्रुकच्या सरपंचपदी सौ.जयश्री दिलीप तरवारे यांची बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणुन के.आर.जाधव यांनी काम पाहिले.ग्रामपंचायत सरपंच कल्पना तरवारे यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्याने रिक्त पदावर निवडणूक घेण्यात आली. यावेळी निर्णय अधिकाऱ्यांकडे सौ.जयश्री तरवारे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.यावेळी गावातून मिरवणूक काढत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.यावेळी तलाठी राठोड,माजी सरपंच कल्पना तरवारे,उपसरपंच हेमराज महाले,प्रतिभा तरवारे,दिपिका चौधरी,साळीबाई भोये,जयेंद्र तरवारे,गोपाळ चौधरी,देविदास महाले, नारायण तरवारे,महादू तरवारे,दत्तू महाले,पांडुरंग तरवारे,अमृत महाले,संजय महाले माजी सरपंच,तुकाराम तरवारे, पुंडलिक कनोजे,रमेश तरवारे,रमेश भोये,सदू सापटे,दिलीप तरवारे,बाळू तरवारे,किरण तरवारे,केशव तरवारे,जनाशेठ तरवारे,अशोक तरवारे,मधुकर महाले, गणेश भोये,जगन गोराळे, शंकर भोये, आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जातेगाव बुद्रुक सरपंचपदी जयश्री तरवारे बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 3:44 PM
गावातून मिरवणूक काढत फटाक्यांची आतषबाजी
ठळक मुद्देसरपंच कल्पना तरवारे यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्याने रिक्त पदावर निवडणूक घेण्यात आली