वणी : पहाट पाडव्याचे औचित्य साधून सप्तशृंगगडावर मंदिराच्या गाभाऱ्यात शाहीर बाळासाहेब भगत आणि रेखा महाजन यांचा ‘जागर आदिशक्तीचा’ हा भक्तिमय गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमात रेखा महाजन यांनी ‘सप्तशृंगी देवी माझी’, ‘जोगवा चांदण चांदण’, ‘डोंगर हिरवागार’, ‘माझी रेणुका माउली’ आदि भक्तिगीते सादर केली. तर बाळासाहेब भगत यांनी ‘आईचा डोंगर गरजला’ या स्वत:च्याच कॅसेटमधील काही निवडक गाणी सादर केली. जोगवा, आईला, कल्लारी भंदार, आईभवानी अशी विविध भक्तिगीते सहगायक भावनाथ कडू, निलेश कडू, सुखदा महाजन, भारती भगत, ज्ञानेश्वर भोर यांनी सादर केली.या कार्यक्रमाचे वैशिष्टय म्हणजे गोंधळी, संबळ, दिमडी, ढफ, तुणतुणे या पारंपरिक वाद्यांचा सहभाग होता. त्यामुळे कार्यक्रमाला एक वेगळी रंगत आली. या गायकांना शरद जाधव, देवीदास साळवे, भावनाथ कडू, निलेश कडू, धनंजय गणाचार्य, नामदेव गणाचार्य, प्रशांत भिसे, सुरेश विसलकर, प्रकाश चव्हाण, प्रभाकर गांगुर्डे यांनी साथसंगत केली.सप्तशृंगगडाचे विश्वस्त वसंतराव देशमुख, अॅड. दिलीप वनारसे, मुख्य व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, भगवान नेरकर, संजय कुलकर्णी, श्रीराम कुलकर्णी आदिंनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. (वार्ताहर)
सप्तशृंगगडावर आदिशक्तीचा जागर
By admin | Published: October 29, 2014 10:21 PM