पिंपळगाव लेप : जऊळके- मुखेड फाटा रस्ताची अतिशय दयनीय अवस्था झाली असून खड्ड्यांमुळे चाळण झालेल्या रस्त्यामुळे वाहनचालकांसह पादचार्यांची मोठी गैरसोय होते आहे.येवला तालुक्यातील पश्चिमभागातील रस्ते अक्षरशः शेवटची घटका मोजत आहे. गेल्या पाच-सहा वर्षांपासुन जऊळके- मुखेड फाटा या रस्ताचे काम रखडले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग याकामाकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरीकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. सातत्याने पडणार्या पावसाने रस्त्याची अतिशय दुरावस्था झाल्याने नागरिकांची येण्या- जाण्याची मोठी परवड होत आहे.तालुक्याच्या गावाला जाण्यासाठी नाशिक-औरंगाबाद महामार्गावर जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. या भागातील असे बरेच रस्ते आहेत, की पायी प्रवास करणे सुद्धा अवघड बनले आहे. पाटोदा, पिंपळगाव लेप, जळगाव नेऊर, जऊळके-जळगाव नेऊर, पाटोदा-सातारे आदीसह परिसरातील अनेक रस्ते दुरावस्थेमुळे, रस्ताच्या मध्यभागीच मोठ-मोठे खड्डे पडलेले असल्याने वाहनधारकांना जीव मुठीत धरून साईट पट्याचा आश्रय घ्यावा लागतो. तसेच कंबर व मणका दुखी अशा व्याधींना सामोरे जावे लागत आहे. सदर रस्तांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून केल्या जात असून जऊळके ग्रामस्थांनी तर उपोषणाचा इशारा दिला आहे.परिसरातील नागरिकांना दळणवळण व शेतीमाल नेण्यासाठी चांगल्या रस्त्याची गरज असते. मात्र, जऊळके- मुखेड फाटा रस्त्यात मोठ- मोठे खड्डे झाले असल्याने वाहनचालकांचे मोठे नुकसान होत आहे. तर पादचार्यांची मोठी गैरसाय होत आहे. सदर रस्ता काम तातडीने हाती घेण्यात यावी, अन्यथा रस्त्यातील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण आंदोलन केले जाईल.- मच्छिंद्र जाधव, युवा तालुकाध्यक्ष, स्वभिमानी शेतकरी संघटना, जऊळके
जऊळके-मुखेड फाटा रस्ताची झाली चाळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 6:48 PM
पिंपळगाव लेप : जऊळके- मुखेड फाटा रस्ताची अतिशय दयनीय अवस्था झाली असून खड्ड्यांमुळे चाळण झालेल्या रस्त्यामुळे वाहनचालकांसह पादचार्यांची मोठी गैरसोय होते आहे.
ठळक मुद्दे गेल्या पाच-सहा वर्षांपासुन जऊळके- मुखेड फाटा या रस्ताचे काम रखडले