नायगाव : हलाखीच्या परिस्थितीमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात नोकरी मिळवून स्थिरस्थावर झालेल्या राजेंद्र केकाणे याच्या मृत्यूच्या बातमीने गावकºयांवर दु:खाचा डोंगरच कोसळला. बातमी कळल्यानंतर सारा गाव अक्षरश: सुन्न झाला.घरची परिस्थती हलाखीची असल्याने राजेंद्रने ठाणगाव येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो शेतात मजुरीचे काम करू लागला. मजुरीच्या पैशांतून त्याने बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्याचे मूळगाव सिन्नर तालुक्यातील टेंभुरवाडी असले तरी राजेंद्रचे आयुष्य तालुक्यातील चिंचोली येथे मामांकडेच गेले. आईच्या निधनानंतर घरातील सर्व जबाबदारी राजेंद्रवरच होती. याच वेळी गावातील संदीप सानप या मित्राच्या बरोबरीने नोकरी शोधत असतांना तो मुंबई (चेंबूर ) येथील सीआईएसएफच्या भरतीला गेला. भरतीत राजेंद्रचे नोकरीचे स्वप्न पूर्ण झाले. सन २००८ मध्ये डेहराडून येथे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर राजेंद्र नोकरीत दाखल झाला. २०११ मध्ये राजेंद्र याचा विवाह संगमनेर तालुक्यातील क-हे - निमोण येथील शोभा हिच्याशी विवाह झाला. त्यांना आर्यन व अनुष्का ही दोन मुले झाली. सर्व काही सरळीत सुरू होते. दहा- बारा दिवसांपूर्वीच राजेंद्र सहकुटूंब गावी येऊन गेला होता. बुधवारी पहाटे राजेंद्र व त्याची पत्नी जखमी झाल्याचे वृत्त गावात येताच संपूर्ण केकाणे कुटुंबाबरोबर चिंचोली गावावर दु:खाचा डोंगरच कोसळला.राजेंद्र याने छोटा भाऊ गणेशचे शिक्षण पूर्ण केले. गणेशलाही मोठ्या भावाप्रमाणे देशसेवेची इच्छा असल्याने त्यानेही सैन्य भरतीसाठी जाण्याचे ठरवले. २०१२च्या सैन्य भरतीत गणेशही सैन्य दलात दाखल झाला. दोघेही कमावते झाल्याने चिंचोली येथेच त्यांनी स्वत:चे घर उभे केले.
नाशिक जिल्ह्यातील जवानाची काश्मीरमध्ये पत्नीसह हत्या गावावर कोसळला दु:खाचा डोंगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 1:24 AM
हलाखीच्या परिस्थितीमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात नोकरी मिळवून स्थिरस्थावर झालेल्या राजेंद्र केकाणे याच्या मृत्यूच्या बातमीने गावकºयांवर दु:खाचा डोंगरच कोसळला.
ठळक मुद्देमजुरीच्या पैशांतून त्याने बारावीपर्यंतचे शिक्षण भरतीत राजेंद्रचे नोकरीचे स्वप्न पूर्ण आर्यन व अनुष्का ही दोन मुले