नाशिक : लष्करी जवानाची रिक्षा प्रवासात विसरलेली तब्बल साडेचार लाख रुपयांची रोकड व कागदपत्रे असलेली बॅग इंदिरानगर पोलिसांच्या तत्परतेमुळे या जवानास परत मिळाली असून, पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्रकुमार सिंगल यांच्या हस्ते ही बॅग परत करण्यात आली़ या रिक्षाचा आठ दिवसांत यशस्वी तपास करणाºया इंदिरानगरमधील पोलीस कर्मचाºयांना पोलीस आयुक्तांनी रिवॉर्ड घोषित केले आहे़पाथर्डी फाट्यावरील ज्ञानेश्वरनगर येथील रहिवासी व लष्करी जवान योगेश बाबूराव पाटील यांनी ३ आॅगस्ट रोजी त्र्यंबकनाका ते ज्ञानेश्वरनगर असा रिक्षाने प्रवास केला़ घरी परतल्यानंतर दोनपैकी एक बॅग रिक्षातच राहिल्याचे त्यांच्या लक्षात आले़. या बॅगमध्ये फ्लॅट घेण्यासाठी जमविलेले ४ लाख ६० हजार रुपये, ओळखपत्र व महत्त्वाची कागदपत्रे होती़; मात्र पाटील यांनी रिक्षा नंबरही पाहिला नसल्याने त्यांनी तत्काळ इंदिरानगर पोलीस ठाण्यात माहिती दिली़ इंदिरानगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक फुलदास भोये यांनी तत्काळ या प्रकरणाची दखल घेत रिक्षाचालकाचा तपास करण्याबाबत मार्गदर्शन केले़सिडकोतील विजयनगर येथे राहणारा अनिल दगडू राठोड(३०, मूळ रा. चंडिकावाडी, जळगाव) याची रिक्षा असल्याचे तपासातसमोर येताच त्याच्या मूळगावी जाऊन या पथकाने रोकड व बॅग हस्तगत केली़
जवानाची विसरलेली रोकडची बॅग मिळाली पोलिसांमुळे परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 12:09 AM