त्र्यंबकेश्वर : महाराष्ट्रात पर्यटन व्यवसाय वाढविण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारचा पर्यटन विभाग सातत्याने प्रयत्न करीत आहे. यामध्ये योग विद्या माध्यमातून पर्यटनवृद्धी होईल याबाबत सरकारची खात्री झाली आहे. म्हणूनच योगाला चालना देऊन पर्यटन वाढविण्यावर भर देणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावल यांनी केले.त्र्यंबकेश्वरजवळील तळवाडे येथील आंतरराष्ट्रीय योग विद्या केंद्रात आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. त्यांच्या समवेत भाजपाचे प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, विक्रांत चांदवडकर, वसुदैव कुटुंबकम गुरुकुलाचे विश्वासराव मंडलिक, समीर मंडलिक उपस्थित होते.रावल म्हणाले, महाराष्ट्राला समृद्ध वनसंपदा लाभलेली आहे. त्यातल्या त्यात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दोन वर्षांपूर्वी वृक्षलागवडीचे आवाहन केले होते, त्यामुळे सृष्टीसौंदर्यात भरच पडली आहे. त्र्यंबकसारख्या तीर्थक्षेत्र व वनौषधीने समृद्ध अशा निसर्गरमणीय शहरात पर्यटनाला व वनौषधीला वाव मिळत आहे. तसेच देशातील योग विद्या शिकण्यासाठी विदेशातील छात्रशिक्षक येत असतात. त्यांना योगाबरोबरच पर्यटनाचेदेखील आकर्षण आहे. रावल यांनी संपूर्ण गुरुकुलाची पाहणी केली. समीर मंडलिक यांनी येथील कामकाजाची माहिती दिली.
जयकुमार रावल : तळवाडे येथील आंतरराष्टÑीय योग विद्या केंद्राला सहकाºयांसमवेत भेट योगाच्या माध्यमातून पर्यटनाची व्याप्ती वाढविणार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 11:45 PM
महाराष्ट्रात पर्यटन व्यवसाय वाढविण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारचा पर्यटन विभाग सातत्याने प्रयत्न करीत आहे. यामध्ये योग विद्या माध्यमातून पर्यटनवृद्धी होईल याबाबत सरकारची खात्री झाली आहे.
ठळक मुद्देमहाराष्ट्राला समृद्ध वनसंपदा लाभलेली पर्यटनाला व वनौषधीला वावयोग विद्या शिकण्यासाठी विदेशातील छात्रशिक्षक