शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
4
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
5
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
7
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
8
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
9
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
10
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
12
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
13
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
15
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
16
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
17
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
19
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
20
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर

जायकवाडी भरले; नाशिककर तरले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 12:25 AM

मराठवाड्यातील जायकवाडी धरणाने नाशिककरांसाठी दिलासा देणारी आनंदवार्ता दिली आहे. जायकवाडी धरणातील पाणीसाठा ९८ टक्क्याहून अधिक होऊन तब्बल नऊ वर्षांनंतर धरणाचे १८ दरवाजे उघडण्यात आले आहेत. जायकवाडी जवळपास भरल्याने गंगापूर धरण समूहातून यंदा पाणी सोडण्याची आवश्यकता भासणार नाही. त्यामुळे, गेल्या काही वर्षांपासून उद्भवणाºया नाशिक-नगर-मराठवाडा यांच्यातील पाणीतंट्याला यावर्षी तरी तिलांजली मिळाली आहे.

नाशिक : मराठवाड्यातील जायकवाडी धरणाने नाशिककरांसाठी दिलासा देणारी आनंदवार्ता दिली आहे. जायकवाडी धरणातील पाणीसाठा ९८ टक्क्याहून अधिक होऊन तब्बल नऊ वर्षांनंतर धरणाचे १८ दरवाजे उघडण्यात आले आहेत. जायकवाडी जवळपास भरल्याने गंगापूर धरण समूहातून यंदा पाणी सोडण्याची आवश्यकता भासणार नाही. त्यामुळे, गेल्या काही वर्षांपासून उद्भवणाºया नाशिक-नगर-मराठवाडा यांच्यातील पाणीतंट्याला यावर्षी तरी तिलांजली मिळाली आहे. गेल्या काही वर्षांपासून मराठवाडा दुष्काळाचे चटके सहन करत आला आहे. मराठवाड्याची तहान भागविणारे जायकवाडी धरण हे बव्हंशी नाशिकमधील गंगापूर धरण समूहावर अवलंबून आहे. त्यामुळे जायकवाडीत पाणीसाठा अत्यल्प असला, की गंगापूर धरण समूहासह नगर जिल्ह्यातील मुळा प्रकल्पातील पाण्याकडे लक्ष केंद्रित होते. जायकवाडीला पाण्याच्या आवर्तनावरून आजवर नगरसह नाशिकमध्ये वाद उद्भवले आहेत. सन २०१५ मध्ये गंगापूर धरणासह मुळा धरणातून मराठवाड्याला पाणी सोडण्याचा मुद्दा राज्यभर चर्चेत आला होता. जायकवाडीच्या उर्ध्व धरणांमध्ये पाण्याचा जेमतेम साठा शिल्लक असताना समन्यायी पाणी वाटपाचा मुद्दा पुढे करून महाराष्टÑ जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या आदेशान्वये गंगापूर धरणातून पाणी सोडण्याची कृती करण्यात आली होती.नाशिक जिल्ह्यातील शेतकरी पाणी आवर्तनासाठी आंदोलन करीत असताना त्यांना डावलून दुसरीकडे मराठवाड्याला पाणी सोडण्यात आल्याने नाशिकमध्ये मोठे जनआंदोलन उभे राहिले होते. त्यातूनच हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालय व राज्य विधी मंडळाच्या अधिवेशनातही प्रचंड गाजले होते. मागील वर्षी, सन २०१६ मध्ये राज्यात सर्वदूर समाधानकारक पाऊस झाला. नाशिककरांना पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरणही ९३ टक्क्याच्या आसपास भरले होते. त्यावेळी जायकवाडी धरणात ८८.७८ टक्के इतका पाणी साठा शिल्लक असल्याने महाराष्टÑ जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या निवाड्यानुसार धरणात ६५ टक्क्यापेक्षा अधिक पाणी साठा असल्यामुळे जायकवाडी धरणाच्या उर्ध्व भागातील धरण समूहातून पाणी सोडण्याची आवश्यकता नसल्याचा निर्णय गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने घेतला होता. त्यानुसार, मागील वर्षी गंगापूर धरणसमूहातील जलसाठा टिकून राहिला परिणामी, नाशिककरांना पाणीटंचाईची धग जाणवली नाही.  यावर्षी तर वरुणराजाची कृपावृष्टी झाली आणि राज्यातील अनेक धरणे ओसंडून वाहताना दिसून येत आहे. जायकवाडी धरणातील पाणीसाठाही ९८ टक्क्यांहून अधिक झाल्याने नऊ वर्षांत प्रथमच धरणातील १८ दरवाजांमधून विसर्ग करण्यात येत आहे. मागील वर्षाप्रमाणेच यंदाही जायकवाडीला पाणी सोडण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे गंगापूर धरणातील मुबलक पाणीसाठ्याचा पुरेपूर वापर नाशिककरांना करता येणार आहे. गंगापूर धरण समूहासह जायकवाडी धरणही भरल्याने किमान पुढील दोन वर्षे तरी नाशिक-नगर-मराठवाडा वादाला तिलांजली मिळाली आहे.जायकवाडीला सुमारे ६० टीएमसी पाणीनाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून यंदा जायकवाडीला सुमारे ६० टीएमसीपेक्षाही अधिक पाणी जाऊन पोहोचले आहे. त्यामुळे नऊ वर्षांनंतर प्रथमच जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे हे अर्ध्या फुटाने उघडून सुमारे १५ हजार क्यूसेक वेगाने विसर्ग करण्यात आला. जायकवाडीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणी जाऊन पोहोचण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जाते. यंदाच्या पावसाळ्यात गोदावरी नदीला सहा वेळा पूर आलेला आहे. याशिवाय, गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात प्रचंड पाऊस झाल्याने अनेकदा विसर्ग करण्यात आलेला आहे.