शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

खासगी क्लासेस संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी जयंत मुळे यांची सलग तिसऱ्यांदा निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 7:32 PM

जिल्हा प्रायव्हेट कोचिंग क्लासेस संचालक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रा. जयंत मुळे यांची सलग तिसºयांदा निवड झाली आहे. तब्बल नऊ वर्षांनी लोकशाही पद्धतीने झालेल्या या निवडणुक  प्रक्रियेत जयंत मुळे यांनी त्यांचे विरोधक सुभाष जाधव यांचा २७ मतांनी पराभव करीत विजय मिळवला. त्यानंतर मुळे यांनी शहर संघटनेची कार्यकारी जाहीर केली असून, लवकरच जिल्हा कार्यकारिणीतील तालुकास्तरीय सदस्यांचीही घोषणा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

ठळक मुद्दे खासगी क्लासेस संचालक संघटनेची वार्षिक सभा वार्षिक बैठकीत जिल्हा कार्यकारणीची निवडजिल्हाध्यक्षपदी जयंत मुळे यांची यांची निवड

नाशिक : जिल्हा प्रायव्हेट कोचिंग क्लासेस संचालक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रा. जयंत मुळे यांची सलग तिसऱ्यांदा निवड झाली आहे. तब्बल नऊ वर्षांनी लोकशाही पद्धतीने झालेल्या या निवडणुक  प्रक्रियेत जयंत मुळे यांनी त्यांचे विरोधक सुभाष जाधव यांचा २७ मतांनी पराभव करीत विजय मिळवला. त्यानंतर मुळे यांनी शहर संघटनेची कार्यकारी जाहीर केली असून, लवकरच जिल्हा कार्यकारिणीतील तालुकास्तरीय सदस्यांचीही घोषणा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. नाशिकमधील एका क्लासच्या इमारतीत रविवारी (दि. २०) झालेल्या जिल्हा प्रायव्हेट कोचिंग क्लासेस संचालक संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जिल्हाध्यक्ष पदासाठी त्रैवार्षिक निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत गत दोन त्रैवार्षिक मध्ये बिनविरोध निवड झालेले प्रा. जयंत मुळे यांनीच विजय मिळवून सलग तिसºयांना अध्यक्षपद काबीज केले. सुमारे पाचशे मतदारांपैकी केवळ ८९ मतदारांनी सहभाग घेतलेल्या या निवडणुकीत प्रा. जयंत मुळे यांना ५८, तर त्यांचे विरोधक सुभाष जाधव यांना ३१ मते मिळाली. निवडणूक प्रक्रियेनंतर नवनिर्वाचित अध्यक्षांनी तत्काळ कार्यकारिणी जाहीर केली. यात राज्य प्रतिनिधी म्हणून यशवंत बोरसे व फैजल पटेल, उपाध्यक्षपदी अरुण कुशारे, मुकुंद रनाळकर, अण्णासाहेब नरु टे, शशिकांत तिडके, सचिवपदी लोकेश पारख, खजिनदार अतुल आचळे यांचा समावेश असून, कार्याध्यक्ष विजय डोशी यांच्यासह वाल्मीक सानप, पूनम कांडेकर, संजय कुलकर्णी, सहखजिनदार, संजय अभंग, सहकार्याध्यक्ष किशोर सपकाळे, नीलेश दुसे, सुभाष जाधव, धनंजय धाकणे आदींचाही या समितीत समावेश आहे, तर सिन्नर तालुक्यातून जयदेव जव्हेरी, निफाडमधून सागर सानप,  व कळवणमधून गिरीश येवला यांचा कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे.  

शिकवणी कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणीजिल्हा प्रायव्हेट कोचिंग क्लासेस संचालक संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राज्य शासनाने शिकवणी नियमन कायद्याची अंमलबजावणी करण्याचा ठराव करण्यात आला. तसेत इंटिग्रेटेड क्लासेस, बायोमेट्रिक हजेरी, शाळा महाविद्यालयांसारख्या शिक्षण संस्थांमध्ये नोकरीस असताना खासगी क्लासेस चालविणाऱ्या शिक्षकांवर सरकारने कारवाई करावी, त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणात स्वतंत्र समिती स्थापण करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. सद्यस्थितीत शिक्षण विभागातील विविध अधिकारी आणि संस्थाचालक शिक्षक यांचे संगनमत असल्याचा आरोपही यावेळी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष यशवंत बोरसे यांनी केला आहे. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकTeacherशिक्षकcollectorजिल्हाधिकारीcollegeमहाविद्यालयSchoolशाळा