शिवाजीनगर येथील ७ जागांसाठी पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध होऊन माजी आमदार राजाभाऊ वाजे, युवानेते उदय सांगळे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या गटाची सत्ता आली होती. सरपंच व उपसरपंच निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी शिवदास पगार यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामसेवक मच्छिंद्र भणगीर यांच्या उपस्थितीत विशेष बैठक पार पडली. यात सरपंचपदासाठी जयश्री आव्हाड व उपरसरपंच पदासाठी सुनंदा कांगणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. निर्धारित वेळेत दोन्ही पदासाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने सरपंचपदी आव्हाड, तर उपसरपंचपदी कांगणे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा पगार यांनी केली. कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला. बैठकीस ग्रामपंचायत सदस्य म्हाळू शिवराम साबळे, भिमाजी नागू आव्हाड, संजय किसन आव्हाड, सुरेखा ज्ञानेश्वर आव्हाड, ज्योती सोपान केकाण, संपत आव्हाड, शिवाजी आव्हाड, रघुनाथ आव्हाड, रामनाथ साबळे, एकनाथ साबळे, दत्ताराम कांगणे, संजय आव्हाड, किसन आव्हाड आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो - ०२ शिवाजीनगर सरपंच
सिन्नर तालुक्यातील शिवाजीनगर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी जयश्री आव्हाड, तर उपसरपंचपदी सुनंदा कांगणे यांची बिनविरोध झाली. त्याप्रसंगी कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
===Photopath===
020321\02nsk_8_02032021_13.jpg
===Caption===
फोटो - ०२ शिवाजीनगर सरपंच सिन्नर तालुक्यातील शिवाजीनगर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी जयश्री आव्हाड तर उपसरपंचपदी सुनंदा कांगणे यांची बिनविरोध झाली. त्याप्रसंगी कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.