कळवण : नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस व भाजपा या महाशिवआघाडीचे नगरसेवक जयेश पगार यांची बिनविरोध निवड झाली.उपनगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जयेश पगार यांचे ऐकमेव नामनिर्देशनपत्र पत्र निर्धारित वेळेत दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.विद्यमान उपनगराध्यक्ष कौतिक पगार यांनी राजीनामा दिल्याने जिल्हाधिकारी यांच्या निर्दशानुसार उपनगराध्यक्षपदाची बुधवारी (दि.२०) निवडणुक होऊन अधिकृत घोषणा करण्यात आली.उपनगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जयेश पगार यांचे अनुराधा पगार व अतुल पगार हे सूचक व अनुमोदन असलेले एकमेव नामनिर्देशन दाखल झाल्याने बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार बी. ए. कापसे यांनी केली. यावेळी मुख्याधिकारी सचिन माने उपस्थित होते.या निवडीबाबत घोषणा होताच समर्थकांनी फटाके फोडून आनंद साजरा केला. उपनगराध्यक्ष निवडीप्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार, गटनेते कौतिक पगार, सुधाकर पगार, अतुल पगार, बाळासाहेब जाधव, नगरसेवक सुनीता पगार, अनिता जैन, रंजना जगताप, अनुराधा पगार, रंजना पगार, अनिता महाजन, रोहीणी महाले, दिलीप मोरे, साहेबराव पगार, योगेश पगार व मुरलीधर अमृतकार उपस्थित होते.या निवडीप्रसंगी हरिभाऊ पगार, जितेंद्र पगार, गौरव पगार, शरद पगार, अविनाश पगार, मनोज पगार, प्रशांत पगार, मोयोद्दीन शेख, भाऊसाहेब पवार, मनिष पगार, मिठू निकम, दादा निकम आदीसह तालुक्यातील विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.साडेचार वर्षापूर्वी महाशिवआघाडी स्थापनराज्यात महाशिवआघाडी स्थापनाच्या राजकीय हालचाली सुरु आहेत. मात्र साडेचार वर्षांपूर्वी कळवण नगरपंचायतमध्ये गटनेते कौतिक पगार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस व भाजपच्या सदस्यांची मोट बांधून महाशिवआघाडी अस्तित्वात आणली असून या आघाडीची निर्विवाद सत्ता आहे. १७ नगरसेवक असलेल्या कळवण नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भारतीय जनता पार्टी व शिवसेना यांच्या महाशिवआघाडीची सत्ता असून आघाडीचे १४ तर भाजपचे ३ नगरसेवक आहेत.शहराच्या विकासासाठी प्रयत्नशीलराष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजप व शिवसेनेचे सदस्य आम्ही एकसंघ आहे. कळवण शहराच्या विकासासाठी पक्षभेद विसरून मिळालेल्या संधीचे सोने करून जनतेला मूलभूत सुविधा मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आह. सर्व पक्षाच्या नगरसेवकांनी माझ्यावर टाकलेला विश्वास मी सार्थ करेन.- जयेश पगार, उपनगराध्यक्ष, कळवण नगरपंचायत.