नाशिक : रात्रीच्या सुमारास मुंगसरे शिवारातील शासकीय जमिनीतून जेसीबीचा वापर करून गौणखनिजाचे उत्खनन करणारा जेसीबी प्रभारी प्रांत अधिकाऱ्याने मंडळ अधिकाºयाच्या स्वाक्षरीने पंचनामा करून पकडलेला असताना तब्बल नऊ महिन्यांनंतर विद्यमान प्रांत अधिकाºयाने सदर जेसीबीवर कोणतीही दंडात्मक कारवाई न करता सोडून दिल्याने महसूल खात्याच्या कारवाईविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे ज्या मंडळ अधिकाºयाने जेसीबी गौणखनिजाचे उत्खनन करीत असल्याचा पंचनामा केला, त्याच मंडळ अधिकाºयाने नंतर आपला पंचनामा बदलून जेसीबी सुटण्याचा मार्ग सुकर केल्याचे उघड झाले आहे.तासाभरासाठी वीस ते पंचवीस हजार रुपये दर आकारणी करणारा जेसीबी गेल्या नऊ महिन्यांपासून नाशिक तहसील कार्यालयात कारवाईदरम्यान उभा करून ठेवण्यात आला होता. मात्र आता कारवाई न करताच सोडून देण्यात आल्याने एक तर प्रभारी प्रांत अधिकाºयांनी केलेली कारवाई चुकीची होती किंवा विद्यमान प्रांत अधिकाºयांच्या कृतीमागे काही तरी ‘अर्थ’ दडलेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. एरव्ही गौणखनिजाची कारवाई चुकीची केली म्हणून ओरडणाºया गौणखनिज माफियांनी नऊ महिने विना कारवाई जेसीबी डांबून ठेवणाºया महसूल खात्याविषयी साधी तक्रारही न केल्याने तर या साºया प्रकरणात काळेबेरे असण्याची शक्यता बळावली आहे. नाशिकचे प्रभारी प्रांत सोपान कासार यांनी १४ मे २०१८ रोजी रात्री मुंगसरे शिवारातील सरकारी जमीन गट नंबर ११३ मधून रात्री गौणखनिजाचा उपसा करणाºया जेसीबीवर (क्रमांक एमएच १२, बी ६९३३) कारवाई केली होती. सुमारे १३९ ब्रास मुरमाचा उपसा केल्याने सदर जेसीबी मालक अर्जुन नाईक याला सात लाख ९१ हजार रुपयांच्या दंडाची नोटीस बजावली. सदरचा जेसीबी नाशिक तहसील आवारात आणून उभा करण्यात आल्याने गेल्या नऊ महिन्यांपासून तो धूळखात पडला होता. यासंदर्भात जेसीबीच्या मालकाने आपली बाजू नाशिक तहसीलदारांकडे मांडली असता, त्याचे म्हणणे फेटाळून लावण्यात आल्याने जेसीबीचालकाने नाशिकचे विद्यमान प्रांत कुमार आशीर्वाद यांच्याकडे अपील दाखल केले. या अपिलाची सुनावणी होऊन एकाच घटनेसाठी तब्बल दोन वेळा आणि तेही नऊ महिन्यांच्या कालावधीनंतर मुंगसरे मंडळ अधिकाºयांकडून पुन्हा जागेचा पंचनामा करण्यात आला व जेसीबीच्या चालकाने रात्री पाइपलाइन खोदकामासाठी जमिनीचे उत्खनन केल्याचा निष्कर्ष काढून विना कारवाई तो निर्दाेष मुक्त करण्यात आला.(फोटो ३० जेसीबी)
दंड न करताच कारवाईसाठी जप्त जेसीबीची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 12:29 AM
नाशिक : रात्रीच्या सुमारास मुंगसरे शिवारातील शासकीय जमिनीतून जेसीबीचा वापर करून गौणखनिजाचे उत्खनन करणारा जेसीबी प्रभारी प्रांत अधिकाऱ्याने मंडळ अधिकाºयाच्या स्वाक्षरीने पंचनामा करून पकडलेला असताना तब्बल नऊ महिन्यांनंतर विद्यमान प्रांत अधिकाºयाने सदर जेसीबीवर कोणतीही दंडात्मक कारवाई न करता सोडून दिल्याने महसूल खात्याच्या कारवाईविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे ज्या मंडळ अधिकाºयाने जेसीबी गौणखनिजाचे उत्खनन करीत असल्याचा पंचनामा केला, त्याच मंडळ अधिकाºयाने नंतर आपला पंचनामा बदलून जेसीबी सुटण्याचा मार्ग सुकर केल्याचे उघड झाले आहे.
ठळक मुद्देमहसूल खाते संशयास्पद : एकाच व्यक्तीचे दोन पंचनामे