जेईई, नीट परीक्षेच्या विरोधात काँग्रेसची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 01:09 AM2020-08-29T01:09:43+5:302020-08-29T01:10:07+5:30
नाशिक : कोरोनाचे संकट लक्षात घेवून जीईटी-नेट परीक्षा पुढे ढकलण्यात यावी या मागणीसाठी नाशिक शहर कॉँग्रेसच्या कमिटीच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर शुक्रवारी निदर्शने करण्यात आली.
नाशिक : कोरोनाचे संकट लक्षात घेवून जीईटी-नेट परीक्षा पुढे ढकलण्यात यावी या मागणीसाठी नाशिक शहर कॉँग्रेसच्या कमिटीच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर शुक्रवारी निदर्शने करण्यात आली.
यावेळी तहसीलदार शिंदे यांना देण्यात आलेल्या निवेदनात काँग्रेसने म्हटले आहे की, कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता सध्याच्या परिस्थितीत जीईटी-नेट या परीक्षा केंद्र सरकारने घेणे योग्य नाही. या परीक्षांना हजर राहण्यासाठी विद्यार्थ्यांसमोर असंख्य अडचणी आहेत. देशभर कोरोना विषाणूचे संक्रमण अजून कायम असुन धोका कमी झालेला नाही. कोरोनावर मात करण्यासाठी गर्दी टाळणे हा महत्वाचा उपाय सरकारनेच सुचवलेला आहे. अशा वेळी लाखो विध्यार्थीना जीईटी-नेट ची परीक्षा देण्यासाठी आग्रह करणे हे संयुक्तिक ठरणार नाही. परीक्षा केंद्रात परीक्षा घेण्यासाठी लागणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे एकत्र आल्यास कोरोना संक्रमण होण्याची भीती आहे. हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने लाखो विध्यार्थी,पालक, शिक्षक व परीक्षेशी निगडित इतर घटकांच्या आरोग्य व भवितव्याचा विचार करून या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली. निदर्शने आंदोलनामध्ये शहर अध्यक्ष शरद आहेर, प्रदेश प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील, महिला शहर अध्यक्षा वत्सला खैरे, युवक काँग्रेस अध्यक्ष स्वप्नील पाटील, रईस शेख, सुरेश मारू, विजय राऊत, अनिल कोठुळे, प्रमोद धोंडगे, संतोष ठाकूर, बबलु खैरे, उद्धव पवार, दिनेश निकाळे, कैलास कडलग आदी सहभागी झाले होते.