सिडको : एकविसाव्या शतकातील जिजाऊंनी आपल्या शिवाजीला समाजप्रबोधनाचे धडे द्यावेत, तसेच राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवबाचा आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन महिला उद्योजक शुभदा चांदगुडे यांनी केले.मराठा रेफरल बिझनेस क्लबतर्फे जिजाऊ जन्मोत्सव विशेष शिव उद्योगनीती पुरस्काराचे वितरण चांदगुडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी उद्योजिका अर्चना पाटील होत्या. यावेळी बोलताना चांदगुडे यांनी, आजच्या युगात महिलांनी आपल्या मुलींना कसे राहावे हे शिकविण्यापेक्षा आपल्या मुलाने कसे आचरण करावे, हे शिकविण्याची गरज निर्माण झाली आहे, असे सांगितले. यावेळी शिव उद्योगनीतीचे उद्घाटन उद्योजिका महिलांच्या हस्ते करण्यात आले.सूत्रसंचालन योगेश आडके यांनी केले. याप्रसंगी मराठा रेफरल बिझनेस क्लबचे सुशील वाडकर, योगेश निकम, अभय सोनवणे, गणेश चौधरी, सनदी लेखापाल विकास हासे, योगेश आहेर, नीलेश देशमुख, जयंत काळोगे, हरिता देवरे, वैभव गवारे, मधुरा पाटील आदी उपस्थित होते.यांचा झाला सत्कारमराठा रेफरल बिझनेस क्लबतर्फे जिजाऊ जन्मोत्सव विशेष शिव उद्योगनीती पुरस्काराचे वितरण प्रसंगी सरला नवनाथ वरंदळ, शुभदा तिडके- चांदगुडे, गायत्री शुक्लेश्वर वर्पे, मीनाक्षी बाबासाहेब दळवी, रोहिणी विनोद सोनवणे, नीता बाळासाहेब आचारी या महिलांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
जिजाऊ, शिवबाचा आदर्श घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 1:12 AM
एकविसाव्या शतकातील जिजाऊंनी आपल्या शिवाजीला समाजप्रबोधनाचे धडे द्यावेत, तसेच राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवबाचा आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन महिला उद्योजक शुभदा चांदगुडे यांनी केले.
ठळक मुद्देचांदगुडे : शिव उद्योगनीती पुरस्कार वितरण