नाशिक : भद्रकाली पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.२५) विभागीय स्तरावर आयोजित गुन्हेगार सुधार मेळाव्यात भद्रकाली, मुंबई नाका, सरकारवाडा v पोल
गंगापूर पोलीस ठाणे या चारही पोलीस स्टेशन हद्दीतील एकूण ६४ गुन्हेगार उपस्थित होते. यापैकी सात गुन्हेगारांना सुधारण्याची संधी म्हणून नोकरी मिळाली आहे.
गुन्हेगारांना गुन्हेगारीपासून परावृत्त करण्यासाठीचे उपाय व समाजात पुन्हा सन्मानाने जगता यावे म्हणून नाशिक शहर पोलिसांकडून गुन्हेगार सुधार योजना राबविण्यात येत आहे. गुन्हेगार सुधार मेळाव्याकरिता उपस्थित असलेल्या गुन्हेगारांना पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्यासह उपायुक्त संजय बारकुंड, अमोल तांबे यांनी मार्गदर्शन केले.
मेळाव्यामध्ये चारही पोलीस स्टेशनच्या एकूण ६४ गुन्हेगारांनी सहभाग घेतला. यात हिस्ट्रीशिटमधून एकूण १६ नावे कमी करण्यात आली. तर सर्व्हेलन्स रजिस्टरमधून एकूण ११ नावे कमी करण्यात आली. नॉनक्रिमीनल रजिस्टरमधील एकूण २६ गुन्हेगारांची नावे कमी करण्यात आली. तडीपारसंदर्भात २ गुन्हेगारांचा फेरविचार करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे
शहरातील नामांकित उद्योजक, सिक्युरिटी एजन्सीज, समाजसेवक, व्यावसायिक यांनी वेळेवर माहिती घेऊन एकूण ०७ गुन्हेगार लोकांना तात्काळ नोकरीचे नियुक्तीपत्र देण्यात
आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.