पंचवटी : हिरावाडीतील प्रभाग क्र मांक ३ मध्ये असलेल्या स्व. मीनाताई ठाकरे क्र ीडा संकुललगतच्या पाटकिनाऱ्याला लागून महापालिका प्रशासनाच्या वतीने नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक साकारण्यात येत आहे. जॉगिंग ट्रॅकचे काम पूर्ण होणे बाकी असले तरी ट्रॅकवर खडी तसेच माती मोठ्या प्रमाणात पडलेली असल्याने व ट्रॅकचे सपाटीकरण केले नसल्याने सध्या ट्रॅकची वाट बिकट असल्याचे बोलले जात आहे. ठेकेदाराने केलेले काम निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्र ार नागरिकांनी केली आहे.महापालिका प्रशासनाकडून सदर ट्रॅकचे काम पूर्ण झाले असे सांगितले जात आहे. याठिकाणी दोन्ही बाजूला लोखंडी गेट लावण्याचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. नागरिकांचे शारीरिक आरोग्य तंदुरुस्त रहावे, यासाठी प्रशासनाने नागरिकांच्या हितासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून फिरण्यासाठी जॉगिंग ट्रॅक तयार केला आहे. सकाळच्या सुमाराला नागरिक फिरण्यासाठी येत असतात.या ट्रॅकवर खडी-माती टाकली असली तरी त्यावर पाणी मारून त्याची व्यवस्थित सपाटीकरण केलेली नसल्याने नागरिकांना या ट्रॅकवरून ये-जा करताना दगडमाती वरून चालावे लागते. रस्ता सपाटीकरण करण्यासाठी पाण्याचा मारा करून त्या ठिकाणी रोलर फिरविणे गरजेचे असताना प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे, तर ज्या ठेकेदाराने काम घेतले त्याचीच काम पूर्ण करण्याची जबाबदारी असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.सदर जॉगिंग ट्रॅकचे काम जैन नामक ठेकेदाराकडे असल्याचे मनपा सूत्रांनी सांगितले, तर ठेकेदाराला कामाची काही रक्कमदेखील आता केल्याने ठेकेदार कामाकडे दुर्लक्ष करीत आहे,असे बोलले जात आहे. ट्रॅक पूर्ण होण्यापूर्वी पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने ट्रॅक पूर्ण झाल्यानंतर त्याची देखभाल प्रशासन कशी करणार? असा प्रश्न नागरिकांनी व्यक्त केला आहे. जॉगिंग ट्रॅकचे काम काही प्रमाणात निकृष्ट दर्जाचे झाले असल्याच्या तक्र ारी नागरिकांनी केल्या असून, प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन सदर ट्रॅकची पाहणी करत त्यावर पडलेली खडी, माती उचलून रस्त्याची सपाटीकरण करणे गरजेचे आहे.
जॉगिंग ट्रॅकची वाट बनली बिकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 12:48 AM