इंदिरानगर : इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक ते शास्त्रीनगर रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या विक्रेत्यांच्या हातगाड्यांमुळे वाहतुकीस अडथळा होत असल्याच्या तक्रारीची दखल घेत महापालिकेच्या पूर्व विभागाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने बुधवारी परिसरात मोहीम राबवून चार हातगाड्या, दोन वजन काटे आणि भाजीपाला जप्त केला. यासंदर्भात ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते.जॉगिंग ट्रॅक ते चार्वाक चौक हा गजानन महाराज रस्ता इंदिरानगरमधील जुना व मुख्य रस्ता म्हणून ओळखला जातो. या रस्त्यालगत शास्त्रीनगर, आदर्श कॉलनी, मोदकेश्वर कॉलनी, कमोदनगर, जिल्हा परिषद कॉलनी, अरुणोदय सोसायटी, मानस कॉलनी, महारुद्र कॉलनी यांसह विविध कॉलनी व सोसायट्या आहेत. तसेच विविध उपनगरात जाण्यासाठी हा जवळचा मार्ग असल्याने दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ सुरू असते. परंतु सायंकाळी सहा वाजेनंतर जॉगिंग ट्रॅक ते शास्त्रीनगर या रस्त्यादरम्यान दुतर्फा भाजी व खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या हातगाड्या उभ्या राहात असल्याने व त्यांच्याकडे येणारे ग्राहक आपली वाहने रस्त्यावर सर्रासपणे उभी करीत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. सदर मोहीम विभागीय अधिकारी रवींद्र धारणकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवंत वाघ यांच्यासह कर्मचाऱ्यांनी राबविली.हातगाड्या, वजनकाटे, भाजीपाला जप्तसायंकाळी सहा वाजेनंतर अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवली जात नसल्याने रस्त्यावर ठाण मांडून बसणाºया विक्रेत्यांचे फावत होते. या रस्त्यावरील अतिक्रमण काढून वाहतुकीस रस्ता मोकळा करण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली होती. यासंदर्भात ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच अतिक्रमण विभागाने जॉगिंग ट्रॅक ते शास्त्रीनगर आणि सावरकर चौक ते पांडव नगरी वडाळा पाथर्डी रस्त्यादरम्यान रस्त्यावर ठाण मांडून बसलेल्या खाद्यपदार्थ व फळविक्रेते यांच्या चार हातगाड्या, दोन वजनकाटे आणि काही भाजीपाला जप्त करण्यात आला.
जॉगिंग ट्रॅक रस्त्यावरील अतिक्रमणे हटविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2020 12:21 AM