इंदिरानगर : जॉगिंग ट्रॅकलगत निलगिरी वृक्षांच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात गाजरगवत वाढल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढल्याची तक्रार त्रस्त नागरिकांनी केली आहे.पावसाने उघडीप घेताच गुलाबी थंडीची चाहुल लागली आहे. चालणे हा उत्तम व्यायाम असल्याने सकाळी व सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात. याठिकाणी डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, फेरफटका मानणाऱ्या नागरिकांना त्रासांना सामोरे जावे लागत आहे. गाजरगवताचे विल्हेवाट लावण्याची मागणी होत आहे.इंदिरानगर, सूचितानगर, दीपालीनगर, परबनगर, विनयनगर, साईनाथनगर, राजीवनगर, सार्थकनगर कलानगरसह परिसरातील आबालवृद्ध सकाळी व सायंकाळी जॉगिंग ट्रॅकवर फेरफटका मारण्यासाठी येतात. परंतु समांतर रस्ता ते साईनगर चौफुली दरम्यानलगत असलेले सुमारे शेकडोंच्या संख्येने निलगिरी या वृक्षांच्या दरम्यान गाजरगवताचे व घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.जॉगिंग ट्रॅकवर दररोज पाणी न मारले जात असल्याने फेरफटका मारणाºया नागरिकांना धुळीस सामोरे जावे लागत आहे. तसेच निलगिरी वृक्षाचा पालापाचोळा पडलेला आहे. याठिकाणी डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, फेरफटका मानणाºया नागरिकांना त्रासांना सामोरे जावे लागत आहे. गाजरगवताचे विल्हेवाट लावण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.
जॉगिंग ट्रॅक लपला गाजरगवतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 12:38 AM