नाशिक : मुकणे धरणग्रस्तांना इगतपुरीमधील जिंदाल पॉलीफिल्म प्रा. लि. या कंपनीत कायमस्वरूपी सामावून घ्यावे तसेच जास्तीत जास्त स्थानिकांना या कंपनीत नोकरी मिळण्याकरिता आमदार जयंत जाधव यांच्या पुढाकाराने कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या दालनात बैठक घेण्यात येऊन त्यात स्थानिकांना तत्काळ सामावून घेण्याचे आदेश देण्यात आले.मुकणे धरणातील पाणीवाटप करताना पाण्याच्या मोबदल्यात मुकणे धरणग्रस्तांना जिंदाल पॉलीफिल्म प्रा. लि. कंपनीत सामावून घेण्याबाबत कंपनीने करारनामा केलेला आहे. परंतु करारनामानुसार अद्याप धरणग्रस्तांना कंपनीत सामावून न घेतल्याने त्यांच्यावर अन्याय होत असल्याचे यावेळी बोलताना आमदार जयंत जाधव यांनी म्हटले. तसेच औद्योगिक विकासाच्या लाभामध्ये स्थानिक जनतेला योग्य वाटा मिळावा याकरिता नियमानुसार स्थानिक उमेदवारांना ८० टक्के आणि प्रकल्पग्रस्तांना ५ टक्के याप्रमाणे कंपनीने नोकरीत सामावून घेतले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.कंपनी प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांना प्राधान्याने कंपनीत सामावून घ्यावे. तसेच कंपनीतील कंत्राटी कामगार हे निकषाप्रमाणे आहे की निकषापेक्षा जास्त आहे, यावर सखोल तपासणी करून शासनाला तसा अहवाल सादर करावा. असे निर्देश यावेळी देण्यात आले़यावेळी विकास आयुक्त पंकज कुमार, कामगार सहसचिव विधले, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील, कामगार उपायुक्त दाभाडे, जिंदाल कंपनीचे महाव्यवस्थापक तारक बॅनर्जी, कार्मिक व्यवस्थापक मिश्रा, गोरख बोडके, उमेश खातळे, धरणग्रस्त काळू पाटील जाधव, बाळासाहेब बोडके, नामदेव खातळे, योगेश गायकर, पांडुरंग खातळे, समाधान मते आदी उपस्थित होते.कंपनीत प्रशिक्षण दण्याचे निर्देशकंपनीला आवश्यक कुशल कामगार तयार करण्यासाठी नाशिकमधील एचएएल व मायको यांसारख्या कंपन्यांच्या धर्तीवर स्थानिक प्रशिक्षणार्थी उमेदवारांना घेऊन त्यांना आपल्या कंपनीने प्रशिक्षण द्यावे व अशा प्रशिक्षित कुशल कामगारांना आपल्या कंपनीत सामावून घ्यावे, असे निर्देश कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी दिले.
जिंदाल कंपनीत स्थानिकांना सामावून घ्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 1:02 AM
नाशिक : मुकणे धरणग्रस्तांना इगतपुरीमधील जिंदाल पॉलीफिल्म प्रा. लि. या कंपनीत कायमस्वरूपी सामावून घ्यावे तसेच जास्तीत जास्त स्थानिकांना या कंपनीत नोकरी मिळण्याकरिता आमदार जयंत जाधव यांच्या पुढाकाराने कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या दालनात बैठक घेण्यात येऊन त्यात स्थानिकांना तत्काळ सामावून घेण्याचे आदेश देण्यात आले.
ठळक मुद्देसंभाजी पाटील : कामगारमंत्र्यांकडे यशस्वी बैठककंपनीने प्रशिक्षण द्यावे