सिडकोतील त्रिमूर्ती चौक येथून मोहिमेस सुरुवात करण्यात आली. त्रिमूर्ती चौक मार्गे सावता नगर, पवननगर, तोरणानगर मार्गे ही मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत ज्या नागरिकांनी मास्क लावलेले नाही अशा ५० हून अधिक नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्या नागरिकांकडे प्लास्टिक कॅरीबॅग आढळल्याने त्यांच्यावर देखील मनपाने कारवाई केली. या मोहीमेमुळे परिसरात नागरिकांसह व्यावसायिंकामध्ये चांगलीच धावपळ उडाली होती.या मोहीमेतुन मास्क वापरा, सामाजीक अंतर ठेवण्याबाबत आवाहन करण्यात येत होते. पोलीस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक नखाते ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर जाधव , श्रीकांत निंबाळकर , सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय बेडवाल तसेच मनपा विभागीय अधिकारी मयुर पाटील , आरोग्य अधिकारी संजय गांगुर्डे ,तसेच मनपा कर्मचारी व पोलीस कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते.
(फोटो १९ अंबड)