लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : लॉकडाउनमुळे हाती कामकाज नसल्याने बेरोजगार झालेले परप्रांतीय मजुरांचा गावाकडे निघालेला लोंढा अजूनही कायम असून, मिळेल त्या वाहनातून मजल दरमजल करीत मजूर गावाकडे परतत आहे. नाशिकसह लगतच्या ठाणे जिल्ह्यातील मजूर मालट्रक्समधून गावाकडे परततांचे चित्र दिसत असून, गाडीच्या ट्रॉलीत दाटीवाटीने बसून, मजुरांचा प्रवास सुरू झाला आहे.बेरोजगार झालेल्या मजुरांनी आपल्या कुटुंबीयांसह पाठीवर संसार घेत गावाच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. मिळेल त्या साधनांचा वापर करीत आणि जमेल तेव्हढे अंतर पायी चालत जाऊन मजुरांनी गावाची वाट धरली आहे. रविवारी सकाळपासूनच मजुरांच्या गर्दीने भरलेल्या मालवाहू वाहनातून मजूर आपापल्या गावाकडे रवाना झाले आहेत. मुंबई आणि ठाणे येथून निघालेले मजूर कसारा घाटात काहीवेळ थांबून पुन्हा यूपी आणि एमपी बॉर्डरच्या दिशेने निघाले.गाड्यांमधून मजुरांची मोठी गर्दी झाल्याने फिजिकल डिस्टन्स नियमांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आल्याचे दिसून आले. मिळेल ते साधन आणि लवकरात लवकर महाराष्टÑ सोडण्याच्या इराद्याने या मजुरांनी सहकुटुंब प्रवासाला सुरुवात केली आहे. संसाराचे गाठोडे आणि कडी-खांद्यावर आपल्या मुलाबांळांना घेऊन गावाकडे हे मजूर निघाले आहेत. ठाण्यातील कामगार असलेले परप्रांतीय तसेच कारागीर म्हणून अनेक व्यावसायिकांकडे काम करणाऱ्या कारागिरांना काही दिवस काम नसल्याने त्यांचे आर्थिक नुकसान झाल्याने आणि पुढील कामाची संधी कधी मिळेल याबाबतची अनिश्चितता असल्याने मजुरांना गावाचा रस्ता धरला आहे. एमपी बॉर्डरकडे धावल्या बसेसनाशिक शहरातून शनिवारी रात्री द्वारका येथून एमपी बॉर्डरच्या दिशेने २१ बसेस रवाना झाल्या. मध्य प्रदेशात जाणाºया प्रवाशांची संख्या मोठी असल्याने पोलिसांनी महामंडळाला बसेस सोडण्याबाबतचे सांगितले होते. त्यानुसार मध्य प्रदेशातील सेंधवा सीमारेषेपर्यंत या प्रवाशांना घेऊन बसेस रवाना झाल्या. शनिवारी रात्री २१ आणि रविवारी दुपारपर्यंत सुमारे दहा बसेस पुन्हा मध्य प्रदेशच्या दिशेने सोडण्यात आल्या. गेल्या दोन दिवसांत बसने सुमारे ६५० परप्रांतीय रवाना झाले आहेत.
परप्रांतीयांचा गावाकडे प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 10:54 PM
नाशिक : लॉकडाउनमुळे हाती कामकाज नसल्याने बेरोजगार झालेले परप्रांतीय मजुरांचा गावाकडे निघालेला लोंढा अजूनही कायम असून, मिळेल त्या वाहनातून मजल दरमजल करीत मजूर गावाकडे परतत आहे. नाशिकसह लगतच्या ठाणे जिल्ह्यातील मजूर मालट्रक्समधून गावाकडे परततांचे चित्र दिसत असून, गाडीच्या ट्रॉलीत दाटीवाटीने बसून, मजुरांचा प्रवास सुरू झाला आहे.
ठळक मुद्दे वेध गावाकडचे : मालट्रक, ट्रेलरमधून हजारोंच्या संख्येने होतायेत रवाना