नाशिक : गीतांमधील अवीट गोडी काळाच्याही पलीकडे जाणवणारे शब्दांचे वेगळेपण आजच्या प्रश्नांशी निगडित आहे, याचीच प्रचिती ‘तकरार भी... इकरार भी...’ या कार्यक्र मातून रसिकांनी घेतली. निमित्त होते श्रवणीय जुन्या हिंदी गीतांवर आधारित या कार्यक्रमाचे आयोजन सावरकरनगर, गंगापूररोड येथे करण्यात आले होते. सुप्रसिद्ध अभिनेता प्रदीप वेलणकर यांनी कार्यक्र म सादर केला.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम संपन्न झाला. कुठलेही गाणे हे स्वत:चा विचार घेऊन येते आणि प्रश्नांचा वेध ही घेत असते. अनेक गीतकारांनी यात प्रयोग केले आणि गाणी अजरामर झाली. कभी खुदपे कभी हालात पे (प्यार की राहें), कैसे कोई जिए (बादबान), जीवन डोर तुम्ही संग बांधी (सतीसावित्री) अशा अनेक गीतांमधून प्रदीप वेलणकर यांनी गीताचे वेगळेपण मांडले. प्रदीप वेलणकरांचा चित्रपट क्षेत्राचा व्यासंग आणि अभिरु ची याचे हे अप्रतिम सादरीकरण होते. तकरार भी-इकरार भी’ गीतांमधील तक्र ार ही प्रेयसी, परमेश्वर, समाज यांच्या विषयी आहे आणि त्याला उत्तर म्हणून इकरार असलेले दुसरे गीत सादर केले. दोन्ही गीते ही वेगवेगळ्या चित्रपटांसाठी असूनही त्यातील सूत्र एकसारखे आहे. हिंदी चित्रपट संगीतातील अनोख्या विश्वाची संगीतमय सफर अभिनेते प्रदीप वेलणकर यांनी घडवली.प्रास्ताविक विश्वास ठाकूर यांनी केले. परिचय डॉ. मनोज शिंपी यांनी केला. प्रदीप वेलणकर, रजनी वेलणकर यांचा सन्मान विनायक रानडे, सारिका देशपांडे यांनी केला. कार्यक्रमास रसिक उपस्थित होते़
वेलणकर यांनी घडविली हिंदी गीतांची सफर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 12:56 AM