बागलाण तालुक्यातील मोराणे (सांडस) येथील मूळ रहिवासी आदित्य शेवाळे जो सध्या लोहोणेर येथे संगणक प्रणाली युनिट चालवितो, याचा विवाह गेल्या महिन्यात दि. २७ ला बागलाण तालुक्यातील आंबसन येथील शेतकरी नितीन नारायण आहिरे यांची कन्या शीतल हिच्याशी झाला. मोठ्या आनंदाने दोघेही वधू-वर आपल्या कौटुंबिक सुखाची स्वप्ने पाहत संसाराला प्रारंभ करीत असताना नियतीच्या मनात काही वेगळेच होते.
विवाहानंतर आपल्या सुखी संसाराची स्वप्ने रंगविण्यात दंग असलेल्या नवविवाहित शीतलची सहा दिवसापूर्वी अचानक तब्बेत बिघडली, म्हणून तिला सटाणा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, येथे तिच्या प्रकृतीत योग्य ती सुधारणा न झाल्याने तिला दोन दिवसांनी मालेगाव येथे हलविण्यात आले. मात्र, तेथेही दोन दिवस उपचार घेतल्यानंतर नाशिक येथे व्होकार्ड हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे शीतलवर उपचार सुरू असतानाच गुरुवारी (दि. १६) पहाटे अचानक शीतल या सुखी संसाराची स्वप्ने अर्धवट सोडून इहलोकीच्या प्रवासासाठी निघून गेली.
सकाळी ११ वाजता अत्यंत शोकाकुल वातावरणात शीतलवर तिच्या सासरी मोराणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. विवाहास एकवीस दिवसांचा कालावधी उलटत नाही तोच नवविवाहितेवर अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ आली. (१६ लोहोणेर)
160921\16nsk_30_16092021_13.jpg
शीतला आहिरे.