शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेचा एकनाथ शिंदेंविरोधात डाव; ठाकरे गटाच्या उमेदवाराला मदत करण्याची भूमिका
2
"पोलिसांच्या गाड्यांमधून महायुतीला रसद"; पवारांच्या दाव्यावर फडणवीस म्हणाले, "त्यांच्या काळात..."
3
संकटमोचकाने घेतली नाशिकमधील नाराजांची भेट; आहेर, भुजबळांच्या बंडखोरीचे आव्हान
4
बोरिवलीत गोपाळ शेट्टी माघार घेणार?; देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतरही संभ्रम कायम
5
अरेरे! लग्नासाठी बनावट IPS; किराणा दुकानात काम करणाऱ्या तरुणाची 'अशी' झाली पोलखोल
6
अवघ्या ५ दिवसात काँग्रेस नेता स्वगृही परतणार; वंचितचा AB फॉर्म घेऊन अर्ज भरला नाही
7
IPL 2025: गेल्या वर्षी २० लाख, यावेळी थेट १४ कोटी... रिटेन होऊन 'हे' ७ खेळाडू मालामाल
8
KBC 16 मध्ये 'मृच्छकटिक' नाटकासंबंधी विचारला १२ लाख ८० हजाराचा प्रश्न! तुम्हाला माहितीये का उत्तर?
9
Adani Power नं बांगलादेशचा अर्धा वीज पुरवठा रोखला, घरांपासून कंपन्यांपर्यंत बत्ती गुल
10
स्पेनमध्ये  'महापूर', 205 जणांचा मृत्यू, 1900 बेपत्ता, 130000 हून अधिक घरांची वीज गुल; पंतप्रधानांनी पाठवले 2000 सैनिक
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: "मी जे काही काम करतो ते पक्ष हितासाठी करतो", निवडणूक लढवण्यावर गोपाळ शेट्टी ठाम
12
जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराची मोठी कारवाई; अनंतनागमध्ये ३ ठिकाणी चकमक, दोन दहशतवादी ठार
13
IND vs NZ: पहिल्या २ कसोटीतील बिघाडीनंतर अखेर टीम इंडियानं घेतली अल्प धावांची आघाडी
14
काकांसोबत पुतण्याही रिंगणात, मतदारसंघ अन् पक्षही वेगळे; कोण कुठून लढणार?
15
एकनाथ शिंदेंच्या विधानानंतर मनसेचा हल्लाबोल; कल्याणची आठवण करून देत म्हणाले...
16
Prashant Kishor : "पैसे घ्या पण बदल्यात 'हे' काम करा"; प्रशांत किशोर यांनी जनतेला केलं अनोखं आवाहन
17
प्रसिद्धीची हवा डोक्यात जाऊन गर्लफ्रेंडपासून गेला दूर, पुढे तिच्याशीच बांधली रेशीमगाठ! आज लग्नाला १६ वर्ष
18
iPhone 16 नंतर 'या' देशानं Google च्या फोनवरही घातली बंदी; कारण काय?
19
"काठीने मारहाण, ३ दिवस टॉयलेटमध्ये बंद"; सावत्र बाप झाला हैवान, चिमुकल्यांनी मांडली व्यथा
20
अमित ठाकरे-सदा सरवणकर वाद: CM एकनाथ शिंदे म्हणतात, "मी राज ठाकरेंना तेव्हाच विचारलं होतं..."

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या पादूकांचा ‘शिवशाही’तून प्रवास; आठ तासानंतर पंढरपूरात पोहचणार

By अझहर शेख | Published: June 30, 2020 12:18 PM

देशावर अन् राज्यावर आलेले कोरोनाचे संकट टळू दे..., असेच साकडे निवृत्तीनाथ महाराजांना घातले असून पंढरपूराच्या राजाकडेही त्यांचे प्रतिनिधी म्हणून हेच मागणे आम्ही मागणार...

ठळक मुद्देकोरोनाचे संकट टळू दे..., असेच साकडे आठ तासांत सुमारे ४०० किलोमीटरचे अंतरइतिहासात प्रथमच निवृत्तीनाथांची पालखी बसमधून

नाशिक : राज्यासह संपुर्ण देश आणि जग सध्या कोरोना या महामारीचा मुकाबला करत आहेत. याच पार्श्वभूमीवर वारकरी संप्रदायाने सामाजिक भान जपत आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर नाशिक जिल्ह्यातील श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरमधून संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या पादूकांची पालखी थेट ‘शिवाशाही’ बसमधून पंढरपूरात नेण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता २० वारकरी भक्त टाळ-मृदुंगांच्या गजरात पालखीला घेऊन बस त्र्यंबकमधून पंढरपूराच्या दिशेने रवाना झाली. ‘आतापर्यंत आम्ही संत निवृत्तीनाथ महाराज अन् विठूरायांच्या भक्तांची वाहतूक केली; मात्र आज चक्क देवाचे सारथ्य करण्याचा योग लाभला’’ अशी भावना बसच्या दोघा चालकांनी व्यक्त करत विठूनामाचा जयघोष केला.

लाखो वारकऱ्यांचा त्र्यंबकनगरीत भरलेला मेळा...देहभान हरखून विठूनामाच्या भक्तीन टाळ-मृदूंगाचा गजर करत लीन झालेले वारकरी भक्त असे चित्र आषाढी एकादशीला त्र्यंबक शहरात पहावयास मिळते. यंदा मात्र हे चित्र नजरेस पडले नाही. काही मोजक्याच वारकºयांच्या उपस्थितीत पादूकांची पालखी त्र्यंबकनगरीतून पंढरपूराकडे रवाना झाली.
यावेळी वारक-यांची प्रवासाअगोदरच कोरोना नमुना चाचणीही करण्यात आली. तसेच सोबत आडगाव येथील वैद्यकिय महाविद्यालयाच्या तीन डॉक्टरांचे पथकही बसमध्ये वारक-यांसोबत आहे. बस कोठेही थांबणार नसून दोन चालकांच्या मदतीने पंढरपूर गाठणार आहे. बसला थांबा देण्यात आलेला नाही. आठ तासांत सुमारे ४०० किलोमीटरचे अंतर या शिवशाही बसला पूर्ण करायचे आहे.बसमध्ये वीस वारक्यांत एक वीणेकरी, झेंडेकरी, टाळकरी यांचाही समावेश आहे. सकाळी तीर्थराज कुशावर्तावर निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुकांची विधीवत पूजा नगराध्यक्ष पुरूषोत्तम लोहगावकर यांनी सपत्नीक पूजा केली. जयंतमहराज गोसावी यांनी निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदिरात पुजाविधी केला.

 

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरNashikनाशिकPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpurपंढरपूरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस