यावेळी श्रीमती खान व डाॅ. परदेशी यांनी अंधश्रद्धेवर विश्वास न ठेवण्याचे व महिलांना विकासाच्या गतिमान प्रवाहात पुढे येण्याचे आवाहन केले.
यावेळी महिलांना सॅनेटरी पॅड, नॅपकीनचे वाटप करून स्वच्छतेचा संदेश दिला. यावेळी ॲड. प्रगती सुरते यांनी महिला गीत सादर केले. महिला बचत गटाच्या नेत्या मथुरा जाधव, वनिता नारळे यांनी आदिवासी महिलांना महिला बचत गटाचे महत्त्व सांगितले. प्रास्ताविक ॲड. विजयामाला वाजे यांनी केले.
यावेळी इगतपुरी न्यायालयातील वकील विजयामाला वाजे, नयना कोरडे, मनीषा भागवत, मनीषा वारुंगसे, मनीषा बागुल, प्रीती चांडक, ललिता आहिरे, स्नेहल केवारे, सेजल पिचा, त्रिशला टाटीया, स्मिता कोरडे, धरती वाजे आदींसह पोलीस कर्मचारी श्रीमती कदम सहभागी झाल्या होत्या.
फोटो- ०८ बिटुर्ली
बिटुर्लीवाडीत आयोजित कार्यक्रमप्रसंगी न्यायाधीश श्रीमती आर. एन. खान व डॉ. हर्षा परदेशी यांच्यासमवेत उपस्थित महिला.
===Photopath===
080321\08nsk_64_08032021_13.jpg
===Caption===
फोटो- ०८ बिटुर्लीबिटुर्लीवाडीत आयोजित कार्यक्रमप्रसंगी न्यायाधीश श्रीमती आर. एन. खान व डॉ. सौ हर्षा परदेशी यांच्यासमवेत उपस्थित महिला.