शहरं
Join us  
Trending Stories
1
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
2
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
3
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
4
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
5
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
6
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
7
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
8
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
9
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
10
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
11
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
12
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
13
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
14
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
15
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
16
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
17
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
18
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
19
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
20
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 

निखळ सत्याच्या शोधासाठी न्याय़ाधिशांचा प्रवास - मृदुला भाटकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 8:56 PM

न्यायलयात न्यायदानाचे काम करताना साक्षी पुराव्यांच्या माध्यमातून न्यायाधिशांसमोर सत्याचे विविद पैलू समोर येतात. या वास्तविकतेतील सत्याच्या वेगवेगळ््या बाजूंची पडताळणी करून परीपूर्ण आधार असलेले निखळ सत्य शोधण्यापर्यंतचा प्रवास न्यायाधिशाला करावा लागत असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश मृदुला भाटकार यांनी केले. 

ठळक मुद्देन्यायाधीशांना घ्यावा लागतो परीपूर्ण सत्याचा शोध सत्यापासून निखळ सत्यापर्यंत न्यायाधिशांचा प्रवास न्यायाधीशाचे काम ईश्वराने दिलेली देणगी

नाशिक : न्यायलयात न्यायदानाचे काम करताना साक्षी पुराव्यांच्या माध्यमातून न्यायाधिशांसमोर सत्याचे विविध पैलू समोर येतात. या वास्तविकतेतील सत्याच्या वेगवेगळ््या बाजूंची पडताळणी करून परीपूर्ण आधार असलेले निखळ सत्य शोधण्यापर्यंतचा प्रवास न्यायाधिशाला करावा लागत असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश मृदुला भाटकार यांनी केले. शंकराचार्य न्यासाच्या कुर्तकोटी सभागृहात रविवारी (दि.११) लेखक तुमच्या भेटीला व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफताना ‘कविता कोर्टातल्या ’ विषयावर त्या बोलत होत्या. व्यासपीठावर जिल्हा न्यायाधीश एम. एस. बोधनकर, महाराष्ट्र व गोवा बार कौंसीलचे सदस्य अ‍ॅड.जयंत जायभावे, नाशिक जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन ठाकरे, शंकराचार्य न्यासाचे अध्यक्ष आशिष कुलकर्णी, ग्रंथालीचे विश्वस्त सुरेश हिंगलासपूरकर आदि उपस्थित होते. मृदुला पाटकर म्हणाल्या, न्यायाधीश म्हणून काम करण्याची संधी ईश्वराने दिलेली देणगी आहे असल्याची शिकवण आपल्याला वडिलांकडून मिळाली. वकिल आणि न्यायाधीशाचे काम वेगवेगळे असून न्यायाधिशाला साक्षिदाराचे वर्तन ओळखता येणे आवश्यक आहे. सर्वसामान्य नागरिकांची न्याय खात्याकडून सेवेची अपेक्षा असते. त्यामुळे न्यायाधीश ही नोकरी नसून ती सेवा आहे ही भावाना न्यायाधिशांनीही जोपासण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्याचप्रमाणे न्यायालयात साक्षीदाराला शपथ देणे हे पवित्र काम असून अशी शपथ देण्याचा मला अधिकार आहे का याविषयी आत्मपरीक्षणही करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. 

टॅग्स :literatureसाहित्यNashikनाशिकCourtन्यायालय