शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

गुन्ह्याचा २० दिवसांतच फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 1:05 AM

मूळ बिहारची असलेली पीडित महिला भाडेतत्त्वावर सिडको परिसरातील आश्विननगर येथे राहत होती. १० सप्टेंबर २०१० साली पीडितेचा घरमालकाने विनयभंग केल्याची घटना घडली होती.

नाशिक : मूळ बिहारची असलेली पीडित महिला भाडेतत्त्वावर सिडको परिसरातील आश्विननगर येथे राहत होती. १० सप्टेंबर २०१० साली पीडितेचा घरमालकाने विनयभंग केल्याची घटना घडली होती. तेव्हापासून हा खटला प्रलंबित होता; मात्र न्यायालयाच्या पटलावर खटला येताच अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी बी. के. गावंडे यांनी २० दिवसांत सुनावणी पूर्ण केली. आरोपी निकेश कांतीलाल शहा (५५,रा.अश्विननगर) यास तीन महिने कारावास आणि एक हजाराचा दंड अशी शिक्षा सोमवारी (दि.९) सुनावली.बिहारच्या एका ३४ वर्षीय महिला भाडेतत्त्वावर राहत असलेल्या इमारतीत वीजपुरवठा सुरू करण्यासाठी गेली होती. यावेळी निकेश शहा याने पीडितेला जवळ घेत विनयभंग केला. यामुळे पीडित महिलेने तत्काळ आपल पतीसह अंबड पोलीस ठाणे गाठले होते; मात्र त्यावेळी शहा विरोधात तक्र ार अर्ज घेण्यास पोलिसांनी नकार देत गुन्हा दाखल केला नव्हता. त्यामुळे पीडितेने थेट तत्कालीन उपआयुक्त डॉ. डी. एस. स्वामी, आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांच्याकडे तक्र ार अर्ज केला. यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, न्यायालयात हा खटला प्रलंबित होता. तसेच पीडितादेखील बिहार येथील मूळ गावी राहण्यास निघून गेली. न्यायालयात या प्रकरणाचे कामकाज १९ नोव्हेंबरपासून सुरू झाले. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता विद्या देवरे-निकम यांनी कामकाज पाहिले. त्यात शहा विरोधात ठोस पुरावे आढळून आले. तसेच आरोपी शहा यांनी वयाचे आणि आजाराचे कारण देत शिक्षेत सूट देण्याची विनंती न्यायालयात केली. मात्र हा गुन्हा महिलेविरोधातील अत्याचाराच्या प्रयत्नाचा असल्याने आरोपीवर दया दाखविल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल व महिलांचे मनाधैर्य खचण्यास भर पडेल या विचाराने न्यायालयाने आरोपीने केलेली शिक्षेत सूट मिळण्याची विनंती फेटाळून लावल्याचे देवरे-निकम यांनी सांगितले.पोलिसांचा गलथानपणा उघडतत्कालीन आयुक्तांच्या आदेशानंतरदेखील ठाणे अंमलदारांनी गुन्हा नोंदविण्याऐवजी अदखलपात्र नोंद केली होती.‘कायद्यावर विश्वास असून, न्याय मिळेलच’ या जिद्दीने चिकाटीने पीडित महिलेने पाठपुरावा सुरूच ठेवला. तीन महिन्यानंतर शहा विरोधात विनयभंगाचा गुन्हा अंबड पोालीस नोंदविला; मात्र गुन्ह्याचा तपास करताना तत्कालीन हवालदार बी. के. शेळके यांनी चुकीचा पंचनामा करत न्यायालयात सादर केला. जेव्हा ही बाब लक्षात आल्यानंतर पीडितेने पुन्हा दाद मागितली. पोलिसांनी चौकशी करून त्यात तथ्य आढळल्याने शेळके यांना १ हजार रु पयांचा दंडदेखील ठोठावला होता.

टॅग्स :Courtन्यायालयNashikनाशिक