न्यायडोंगरी : गावासाठी गिरणा धरणाच्या पाण्याशिवाय आता पर्याय राहिलेला नसल्याने सर्व लोकप्रतिनिधी येथील योजना राबविण्यासाठी प्रयत्न करीत असून, लवकरच गिरणाचे पाणी गावास मिळणार असल्याचे संकेत आहेत.नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी गावासाठी यापूर्वी पाणीपुरवठा करणाºया तीनही योजना पाण्याअभावी फोल ठरल्या. या गावाचा मुख्यमंत्री पेयजल योजनेत समावेश झाला असून, ही योजना गिरणा धरणातून राबविली जाणार आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभाग नाशिक यांच्याकडे या योजनेचा समावेश झाला आहे, असे पत्र प्राप्त झाले असल्याची माहिती सरपंच गायत्री मोरे यांनी दिली. त्यामुळे गावकºयांना लवकरच गिरणा धरणाचे पाणी मिळणार, असे चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. न्यायडोंगरीला पाणीपुरवठ्याबाबत पत्रव्यवहार पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे प्रत्यक्षात केल्यानंतर या योजनेच्या मंजुरीला गती मिळाली असून, यासंदर्भात आमदार पंकज भुजबळ यांनीदेखील या योजनेसाठी शिफारस केली होती. सरपंच मोरे यांनी ग्रामपंचायतीत ठराव केला आहे.
न्यायडोंगरीला मिळणार गिरणाचे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 1:09 AM
न्यायडोंगरी गावासाठी गिरणा धरणाच्या पाण्याशिवाय आता पर्याय राहिलेला नसल्याने सर्व लोकप्रतिनिधी येथील योजना राबविण्यासाठी प्रयत्न करीत असून, लवकरच गिरणाचे पाणी गावास मिळणार असल्याचे संकेत आहेत.
ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या आशा पल्लवित : पेयजल योजना राबविण्याचा निर्णय