सचिन मोकासरे यांना काही वर्षांपूर्वी श्वानाचे एक पिल्लू जखमी अवस्थेत सापडले होते. त्यांनी त्याच्यावर उपचार करून घरी आणले व त्याचे ज्युली नामकरण करत पालनपोषण केले. घरातीलच एक सदस्य बनलेल्या ज्युलीने गेल्या सोमवारी (दि.१९) भीमपराक्रम गाजवला. घरातील लहान मुले बाहेर अंगणात खेळत होती. तिथेच असणाऱ्या झुडपात एक कोब्रा नाग होता. बहुधा ज्युलीला धोक्याची चाहूल लागली असावी. तिने क्षणार्धात त्या नागावर झडप घातली. सुमारे अर्धातास ज्युलीची त्या नागाशी झटापट सुरू होती. ज्युलीची ही लढाई पाहून घरातील सदस्यही तिच्या मदतीला धावले, परंतु तिने नागाचा पिच्छा सोडला नाही. त्याला यमसदनी धाडल्यानंतरच ती शांत झाली. मात्र, या झटापटीत ज्युलीला नागाने अनेक ठिकाणी दंश केल्याने काही मिनिटांतच तिच्यात विष भिनत तिनेही निरोप घेतला. ज्युलीने घरातील लहान मुलांचे प्राण वाचवत आपले प्राण त्यागले. आपल्या प्राणाची आहुती देऊन श्वान हा माणसाचा खरा मित्र असल्याचे सिद्ध केले.
इन्फो
तीन दिवसांचा दुखवटा
ज्युलीचा संपूर्ण घराला लळा लागला होता. ती घरातीलच एक सदस्य बनली होती. नागाशी झटापटीत तिचाही मृत्यू झाल्याने ज्युलीच्या मृत्यूमुळे मोकासरे कुटुंबीय सुन्न झाले. त्यांनी ज्युलीचा धार्मिक विधीनुसार अंत्यविधी करत घरात तीन दिवसांचा दुखवटा पाळला. ज्युलीचा हा पराक्रम पंचक्रोशीत चर्चेचा विषय बनला.
फोटो- २० सटाणा स्नेक
===Photopath===
200421\20nsk_31_20042021_13.jpg
===Caption===
फोटो- २० सटाणा स्नेक