नाशिक : गोंदे शिवारातील एका कारखान्यात माल भरण्यासाठी मुंबई-आग्रा महामार्गावरून आडगावमार्गे भरधाव जात असताना आयशर ट्रक भरधावपणे रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत चालक संशयित आरोपी औरंगजेब रफिक खान याचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे त्याने चालत्या ट्रकमधून बाहेर उडी फेकली. ट्रक महामार्गावरील संरक्षक जाळ्या तोडून समांतर रस्त्यावरून खाली जात उलटली यावेळी ट्रकमध्ये बसलेला क्लिनर मोहम्मद अजमेर अमिर खॉँ (३८,रा. बिहार) याच्या शरीरात रस्त्यालगत ठेवलेले लोखंडी गज घुसल्याने जागीच मृत्यू झाला.महामार्गावरून औरंगजेब हा त्याच्या ताब्यातील आयशर ट्रक (यु.पी एएन ०७४२) प्रचंड वेगाने दामटवित होता. यामुळे त्याचा वाहनावरील ताबा सुटला आणि त्याने स्वत:चा जीव वाचविण्यासाठी चालत्या ट्रकमधून दहाव्या मैलाजवळ जऊळके फाट्यावर उड्डाणपूलाच्या २७ व २८ क्रमांकाच्या खांबाजवळ उडी घेतली. त्यामुळे त्याचा जीव वाचला; मात्र त्याने भरधाव ट्रक बेवारसपणे सोडून दिल्याने ट्रक महामार्गावरून पुढे जात समांतर रस्त्याच्या संरक्षक जाळ्या तोडून महामार्गावरून खाली येत उलटला. यावेळी ट्रकमध्ये बसलेल्या मोहम्मद अजमेरच्या शरीरात रस्त्यालगत ठेवलेले गज शिरल्याने तो मृत्यूमुखी पडला. हा अपघात शनिवारी (दि.१८) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडला. उड्डाणपूलाच्या कामासाठी समांतर रस्त्यालगत लोखंडी गज आणून ठेवण्यात आले होते. विनाचालक धावणाऱ्या ट्रकने सुदैवाने रस्त्यावरील अन्य वाहनांना धडक दिली नाही, अन्यथा भीषण अपघात घडला असता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. ट्रकचालकाने त्याचा जीव वाचविण्यासाठी क्लिनरचा जीव धोक्यात टाकल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी आडगाव पोलिसांनी ट्रकचालक औरंगजेबविरूध्द मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी तसेच मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
उडी घेतल्याने ट्रकचालक बचावला अन् क्लिनर मृत्यूमुखी पडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 2:21 PM
दहाव्या मैलाजवळ जऊळके फाट्यावर उड्डाणपूलाच्या २७ व २८ क्रमांकाच्या खांबाजवळ उडी घेतली. त्यामुळे त्याचा जीव वाचला; मात्र त्याने भरधाव ट्रक बेवारसपणे सोडून दिल्याने ट्रक महामार्गावरून पुढे जात समांतर रस्त्याच्या संरक्षक जाळ्या तोडून महामार्गावरू न खाली येत उलटला.
ठळक मुद्देअन्यथा भीषण अपघात घडला असता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेक्लिनरचा जीव धोक्यात टाकल्याचे बोलले जात आहे